पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत आरव विलणकर व सुजाना फर्नांडिस प्रथम…

⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघाच्या वतीने आयोजित पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत बालवाडी ते इयत्ता तिसरी गटात आरव सचिन विलणकर याने आणि चौथी ते सातवी गटात सुजाना फर्नांडिस हिने प्रथम क्रमांक मिळविला.

नारळी पौर्णिमे दिवशी सायंकाळी ही स्पर्धा संपन्न झाली. मालवण व्यापारी संघातर्फे सोमवार पेठ येथील हनुमान मंदिर ते बंदर जेटी अशा काढण्यात आलेल्या मानाच्या श्रीफळाच्या मिरवणुकीत स्पर्धेतील वेशभूषा केलेल्या मुलांनी सहभाग घेतला. यावेळी मुलांनी विविध आकर्षक अशा पारंपारिक वेशभूषा केल्या होत्या.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – गट क्रमांक १- बालवाडी ते इयत्ता तिसरी- प्रथम – आरव सचिन विलणकर, द्वितीय – अन्विता गौरव ओरसकर, तृतीय – अथर्व बांदिवडेकर, उत्तेजनार्थ प्रथम – तनिष चव्हाण, उत्तेजनार्थ द्वितीय – सहारा पवार, गट क्रमांक २ चौथी ते सातवी – प्रथम- सुजाना फर्नांडिस, द्वितीय – अन्विका नेवगी, तृतीय – मनवा वराडकर, उत्तेजनार्थ प्रथम – वेदा बिळवसकर, उत्तेजनार्थ द्वितीय – ख़ुशी सावंत.

या स्पर्धेतील विजेत्यांना हनुमान मंदिर येथे रोख रक्कमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना भेट वस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, रवी तळाशीलकर, विजय केनवडेकर, गणेश प्रभूलकर, बाळू अंधारी, हर्षल बांदेकर, सुहास ओरसकर, अभय कदम, उमेश शिरोडकर आदी व इतर व्यापारी बांधव, भगिनी, पालक उपास्थित होते.

You cannot copy content of this page