सौ. सिद्धी करंगुटकर यांनी पटकाविला सोन्याचा नारळ…

ठाकरे शिवसेना, आम. वैभव नाईक व सौं शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने गेली दहा वर्षे मालवणी मुलुखात मानाची समजली जाणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम. वैभव नाईक आणि सौं. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेत सौं. सिद्धी करंगुटकर यांनी प्रथम क्रमांक पटकविताना सोन्या चांदीच्या नारळ चषकावर आपले नाव कोरले. विजेत्या करंगुटकर सोन्याचे नाणे, सोन्याची नथ, येवला पैठणी आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या सौं. ऐश्वर्या रुपेश काळसेकर यांना सोन्याचे नाणे, सोन्याची नथ, आकर्षक चषक इरकली पैठणी, आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ सौं. योगिता गौरव सरमळकर यांना सोन्याची नथ, आकर्षक चषक, इरकली पैठणी चांदीचा दिवा आणि सन्मानपत्र देण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम. वैभव नाईक आणि सौं. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा मालवण बंदर जेटी येथे संपन्न झाली. सोन्या चांदीच्या बक्षीसांचा वर्षाव करणारी मालवणातील पहिली स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. ही स्पर्धा मालवणी मुलुखात लोकप्रिय असून ही स्पर्धा राज्य स्तरीय भरविण्यात येते. दशपूर्ती साजरी करणाऱ्या या स्पर्धेचे उदघाट्न मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, स्पर्धेचे आयोजक सौं. शिल्पा खोत, माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, पूनम चव्हाण, नंदा सारंग, डॉ. शिल्पा झाट्ये, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, माजी सभापती पूनम खोत, तृप्ती मयेकर, दर्शना कासवकर, महेश जावकर, मंदार ओरसकर, आर्या गावकर, मनोज मोंडकर, बाबी जोगी, सेजल परब, महेंद्र म्हाडगुत, सन्मेष परब, भाई कासवकर, चारुशीला आढाव, गेल्या वर्षीच्या विजेत्या मुंबईच्या नंदिनी परब, इरकल ब्रँडच्या तेजल सोपारकर व अन्य उपास्थित होते.

स्पर्धेचा प्रारंभ शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मशाल पेटवून, शंखनाद करून आणि चारुशीला आढाव यांच्या मालवणी गाऱ्हाण्याने करण्यात आला.

यावेळी पहिली ते सातवीच्या मुलींसाठी नारळ लढविणे स्पर्धा पार पडली. यात आरोही नरे, प्रांजल पेंडूरकर, निशा धुरी आणि चिन्मयी खोत यांना अनुक्रमे पहिली चार पारितोषिके, भेटवस्तू व सन्मानपत्रे देण्यात आली. या स्पर्धेची पारितोषिके मंदार ओरसकर आणि शिल्पा खोत यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे सूत्रसंचालन निवेदक बादल चौधरी व अक्षय सातार्डेकर यांनी केले.

You cannot copy content of this page