सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत सावंत यांचे निधन…

⚡कणकवली ता.१९-: भिरवंडे गावचे रहिवाशी आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुर्यकांत शिवराम सावंत ( ८४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, बहीण, पुतणे असा परिवार आहे. कणकवली उपविभागीय कृषी कार्यालयातील कृषी अधिकारी राजन सावंत यांचे ते वडील, वरवडे अंगणवाडी सेविका स्मिता (चंदना) सावंत यांचे ते सासरे तर पत्रकार अजित सावंत यांचे ते चुलते होत.

You cannot copy content of this page