⚡बांदा ता.१८-:
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी आयोजित केलेल्या मॅरेथॉन रन फॉर हेल्थ स्पर्धेत आठवी ते दहावी या मुलींच्या गटात वंशिका सावंत हिने तर मुलांच्या गटात विराज नाईक याने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन बांदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल राजेश गवस यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेत मुलींच्या गटात गीतांजली देसाई हिने द्वितीय आणि आर्या म्हावळणकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच मुलांच्या गटात बाबुराव वरक याने द्वितीय तर ब्रेन्डन फर्नांडिस याने तृतीय नंबर पटकाविला.
त्याचप्रमाणे खुल्या गटातून भविष्य गंगावणे प्रथम, भावेश माळी द्वितीय व सत्यम रावत यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. ही स्पर्धा बांदा ते इन्सुली खामदेव नाका तेथून पुन्हा बांदा अशी घेण्यात आली.
यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ माळकर, पोलीस कॉन्स्टेबल मयुराज कमतनूरे ,प्रसाद पाटील, प्रथमेश पोवार, प्रशांत बोटे महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियांका परब, रोटरी क्लबचे सदस्य राजाराम ऊर्फ आबा धारगळकर, शैलेश केसरकर, स्वप्निल धामापूरकर, सुदन केसरकर तसेच स्वराज्य प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष केदार कणबर्गी, रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष अवधूत चिंदरकर, अक्षय कोकाटे, दत्तराज चिंदरकर, मिताली सावंत, ईश्वरी कल्याणकर, विनिता कुबडे, कविता बांदेकर, नेहा निगुडकर, शिवम गावडे, अमित धोंगडे, संकेत वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत एकूण ७० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली सावंत हिने केले तर आभार शिवम गावडे याने मानले.
