⚡मालवण ता.१८-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हापरिषद मतदारसंघ व सिंहगर्जना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा येथे आयोजित करण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत संतोष मुणगेकर प्रथम तर स्वप्नील गवंडी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक पप्पु परुळेकर, विनायक परब, विभाग संघटक मंगेश टेमकर, शहरप्रमुख माणिक राणे, मच्छीमार नेते बाबी जोगी, मीनाक्षी मेतर, दीपा शिंदे, महिला संघटक संजना रेडकर, अनुष्का गावकर, मसुरा महिला विभागप्रमुख आर्या गावकर, श्याम घाडी, राजू नार्वेकर, युवासेना आचरा शहरप्रमुख मुन्ना परब, पळसंबं उपसरपंच अविराज परब, छोटू पांगे, तोंडवळी सरपंच सौ. तोंडवळकर मॅडम, उपसरपंच हर्षद पाटील, नाना पाटील, दिपक कांदळकर, नितीन घाडी, रुपेश घाडी, सदानंद घाडी, भाऊ परब, सचिन बागवे, अनिकेत मांजरेकर, संभव परब, नाथा परब, मुकेश सावंत यांच्यासह उप विभागप्रमुख सचिन रेडकर, चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, उपसरपंच पुष्पक घाडीगांवकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण परब, शाखाप्रमुख आबु घागरे, चंद्रकांत परब, रंजन प्रभु, सुभाष परब, मितिंर चिंदरकर, प्रसाद टोपले, ओमकार वळंजु, संजु सामत,दिपेश लब्दे, सागर परूळेकर, दिपक लाड, राज लब्दे, श्रीकृष्ण वायंगणकर, सिंहगर्जना ग्रुपचे अध्यक्ष हर्षद धुरी, सदस्य मयुर खोत, लिलेश मांजरेकर, रोहन पाताडे, पारस मयेकर, जितेश खोत, श्रीधर साटम, प्रसाद टोपले, दर्शन चिंदरकर, राजा वायंगणकर, कुणाल वायंगणकर आदी उपस्थित होते.
आचरा तिठा येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार रुपये व सौरभ सावंत पुरस्कृत आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेचे समालोचन राजा सामंत यांनी केले. स्पर्धेत १३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात आले.
