कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील एन सी सी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून पाचशे वृक्षांची लागवड केली. जंगल संपत्तीचे महत्व ओळखून प्रशालेने सामाजिक वनिकरण यांच्या मार्फत वृक्षांची मागणी करून पर्यावरण आणि निसर्ग यांचे संतुलन राखण्यासाठी साग ‘ शिसम ‘ जांभूळ ‘ फणस ‘ आंबा , बांबू यांची मोठ्या प्रमाणात लागवड करून वनीकरणाच्या विकासासाठी सामाजिक जाणीव ठेवून प्रशालेने मोठ्याप्रमाणात वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेऊन पर्यावरणांचा वसा जपण्याचा प्रयत्न केला.
एनसीसी विभाग प्रमुख अमोल शेळके, हरित सेना प्रमुख संदिप नागभिडकर, राजेंद्र तवटे ,पर्यावरण विभाग प्रमुख प्रसाद राणे, शिरसाठ, यांनी सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व आणि पर्यावरण रक्षण या विषयी जागृती करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रशालेचे मुख्याध्यापक पिराजी कांबळे यांनी प्रशालेच्या वृक्ष लागवडीच्या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या .
पर्यक्षेक सौ. जाधव यांनी वृक्ष लागवड मोहिमेच्या शुभेच्छा दिल्या जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे जंगल संपती व वनिकरण यांचे महत्व विषद केले व शुभेच्छा दिल्या. वृक्ष लागवडीच्या संपूर्ण उपक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा विजयकुमार वळंजू यांनी प्रोत्साहन आणि बळ सर्व विद्यार्थांना व शिक्षकांना देवून या सुंदर उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
