⚡सावंतवाडी ता.१७-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून १८ रोजी तालुक्यातील आंबोली विलवडे पं. स .व बांदा तांबोळी प.स. जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे.याबाबत दौरा पुढीलप्रमाणे आहे.
सरमळे सीतफवाडी दु. १२.०० वा.
पारपोली दु. १.०० वा.
असनिये दु. ३.०० वा.
तांबोळी संध्या. ४.०० वा.
दाभिल संध्या. ५.०० वा.
कोणशी संध्या. ६.०० वा.
भालावल संध्या. ७.०० वा.
विलवडे संध्या. ७.३० वा.
सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख श्री. बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत गावडे,युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाठ महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्यां नरसुले, उपजिल्हाप्रमुख श्री. चंद्रकांत कासार, श्री. प्रकाश गडेकर, तालुकाप्रमुख श्री. यशवंत परब व श्री. संजय गवस, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवा सेना तालुका अधिकारी कौस्तुभ गावडे, महिला आघाडी प्रमुख नम्रता झारपकर, भारती कासार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका संघटक मायकल डिसोजा
यांनी केले आहे.
