‘त्या‘ घटनेच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात मूक निषेध मोर्चा…

⚡वेंगुर्ला ता.१७-: डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेचा वेंगुर्ला येथे निर्षध करत शनिवार सायंकाळी शहरात मूक निषेध मोर्चा काढण्यात आला.

  कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये ३१ वर्षिय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून क्रूर आणि निर्घूण हत्या करण्यात आली. सुमारे ३६ तास रूग्णसेवा करूनही त्या डॉक्टर महिलेला ना हॉस्पिटल प्रशासन वाचवू शकले ना शासन. या घटनेचा वेंगुर्ला येथील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांनी निषेध केला आणि करण्यासाठी वेंगुर्ला शहरातील दाभोली नाका ते हॉस्पिटल नाका असा मेणबत्त्या पेटवून मूक निषेध मोर्चा काढला. या मोर्चात वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर्स तसेच परिचारिका, इरनव्हील व लिनेस क्लबचे पदाधिकारी, वेंगा फिटनेस ग्रुपचे पदाधिकारी, जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, वकिल, सामाजिक कार्यकर्ते आणि संवेदनशील नागरिक सहभागी झाले होते.
You cannot copy content of this page