रेश्मा शिरसाठ: २३ ऑगस्टला धरणे आंदोलन छेडू,स्थानिक बीएड बेरोजगार संघटनेचा इशारा..
⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक बी एड बेरोजगार धारकांनाच. यापुढे नोकरीत प्राधान्य द्यायलाच हवे आम्हाला आता न्याय हवा. पोर्टलमध्ये आमच्यावर अन्याय केला गेला आहे. स्थानिक बेरोजगार धारक जवळपास हजारोच्या संख्येने असताना जिल्ह्याबाहेरील व्यक्तींना स्थान कसे काय दिले जात आहे. त्यामुळे आता यापुढे स्थानिक बीएड व डीएड धारकांनाच प्राधान्य द्या अन्यथा 23 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडू. असा इशारा संघटनेचे अध्यक्ष रेश्मा शिरसाठ यांनी दिला आहे.
दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया राबवली जाईल असे जे अभिवचन दिले आहे. ते वचनही त्यांनी पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक बीएड बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष रेश्मा शिरसाठ श्रीराम कानसे रसिक दळवी सोनाली परब दीपिका कांबळे सिद्धी तिदांत गौरी हिवाळेकर नरेंद्र चव्हाण आदी शेकडो बीएड बेरोजगार धारकांनी सावंतवाडीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सावंतवाडी पर्णकुटी विश्राम राहावर पत्रकार परिषद घेतली.
