Headlines

रेझिंग डे निमित्त पोलिसांच्या शस्त्रांचा ६ ते ८ जानेवारी कालावधीत प्रदर्शन…

सर्व नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी राहणार खुले.. ⚡ओरोस ता ४-: पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग कडून रेझिंग डे च्या अनुषंगाने पोलीस दलाची व कामाकाजाची शस्त्रे, डॉगरक्वॉड, सागरी सुरक्षा, डायल ११२, वायरलेस, सायबर गुन्हे, भरोसा, पोलीस ठाणेचे कामकाज व इतर माहितीचे प्रदर्शन ६ ते ८ जानेवारी कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी व…

Read More

जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन सोमवारी सिंधुनगरीत साजरा होणार…

⚡ओरोस ता ४-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवनात संपन्न होत आहे. राज्याचे मत्स्य बंदर विकासमंत्री नितेश राणे, आ दीपक केसरकर, आ निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित…

Read More

भाजपा सदस्यता अभियानाचा उद्या मेगा ड्राईव्ह…

मंत्री नीतेश राणे प्रत्येक तालुक्यातील अभियानाला देणार भेट:एकाच दिवशी ५० हजार सदस्य संख्येचे उद्दिष्ट.. ⚡ओरोस ता ४-: महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीचे सदस्यता अभियान सुरू असून रविवार ५ जानेवारी रोजी मेगा ड्राईव्ह अर्थात महाअभियान राबविण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात या महाअभियानाचे नियोजन पूर्ण झालेले असून जिल्ह्यातील एकूण ९२१ बुथवर रविवारी दिवसभर हे अभियान सुरू राहणार…

Read More

मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का…

कोळपे ग्रामपंचायत दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे, अशा तीन सदस्यांचा भाजपात प्रवेश:मंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत.. ⚡कणकवली ता.०४-: कोळपे गावचे उबाठा सेनेचे अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत तसेच ग्रामपंचायतचे तीन सदस्य यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. सदस्यांमध्ये दिलीप कांबळे, शुभांगी कांबळे, रजिया सरदार ठाणगे…

Read More

गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग…

वाहनचालकांना वाहने चालविताना होत त्रास:तात्काळ कचरा हटवा, अनेकांकडून होते मागणी.. ⚡बांदा ता.०४-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा एस.टी. स्टॅन्डच्या बाजूला खालसा पंजाबी धाबा नजीक गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग असून यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होत आहे. हा कचरा तात्काळ हटवावा अशी मागणी होत आहे. रस्त्याच्या कडेलाच कामगारांनी साफ केलेल्या कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आला आहे. गेले…

Read More

दैनंदिन जीवनात हिंदूंनी धर्माला प्राधान्य द्यावे:नितेश राणे…

आंबोली,ता.४: भगवे कपडे घातले म्हणजे हिंदुत्व नाही तर हृदयात हिंदुत्व असले पाहिजे,धर्मा बद्दल कडवट पणा असला पाहिजे. दैनंदिन जीवनात धर्माला प्राधान्य दिले पाहिजे. या हिंदुराष्ट्रात फक्त हिंदु नेच सर्वधर्मसमभाव मानावा.त्यावर बंदी आणायला हवी. जिल्ह्यातही वफ्त् बोर्डाने ५० ते ६० ठिकाणी दावा केला आहे. हिंदू चे सरकार आहे.पंतप्रधान मोदी नी त्यासाठी बिल आणले आहे.हिंदू चे सरकार…

Read More

कणकवलीत ९ ते १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्‍सव रंगणार…

सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचा भव्य ऑकेस्ट्रा; समीर नलावडेंची माहिती.. कणकवली : शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात जिल्‍हा भाजपच्यावतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘कणकवली पर्यटन महोत्‍सव’ होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेते सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, नितीन कुमार यांच्यासह पवनदीप आणि अरूणिता तसेच चेतना भारद्वाज याचा भव्य ऑर्केस्ट्रा अनुभवण्याची…

Read More

स्वतःला सिद्ध करण्यासाठी शैक्षणिक व व्यावसायीक पाया मजबूत करा…

मनिष दळवी:बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक युवा महोत्सव ‘प्रभोत्सव‘उत्सव कलागुणांच्या कार्यक्रमाचं थाटात उद्घाटन.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: मुलांनी शिक्षणाबरोबरच आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण अशा सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या माध्यमातून सादर करावेत. यशस्वी नागरीक बनण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याकरीता शैक्षणिक व व्यावसायीक पाया मजबूत करावा लागेल. जिल्ह्यातून सर्व महाविद्यालयीन युवकांसाठी सामुहिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा मानस आहे. त्यालाही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यावा असे…

Read More

सावंतवाडीत १२ रोजी ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०४-:सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात मांडणार आहेत….

Read More

अँड.आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०४-: सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी अँड.आरती पवार यांची निवड झाली व त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी अँड.आरती पवार यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक…

Read More
You cannot copy content of this page