वाहनचालकांना वाहने चालविताना होत त्रास:तात्काळ कचरा हटवा, अनेकांकडून होते मागणी..
⚡बांदा ता.०४-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा एस.टी. स्टॅन्डच्या बाजूला खालसा पंजाबी धाबा नजीक गोव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग असून यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना त्रास होत आहे. हा कचरा तात्काळ हटवावा अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या कडेलाच कामगारांनी साफ केलेल्या कचऱ्याचा ढिगारा टाकण्यात आला आहे. गेले कित्येक दिवस तो कचऱ्याचा ढिगारा तेथेच आहे. वाहनांच्या वेगामुळे या कचऱ्याची धुळ लोकांच्या नाकातोंडात जाते. तसेच या ढिगाऱ्यामुळे अपघात होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात सदर कचऱ्याचा ढिगारा येथून हटवावा अशी मागणी बांदावासीयांकडून होत आहे.
