सर्व नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी राहणार खुले..
⚡ओरोस ता ४-: पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग कडून रेझिंग डे च्या अनुषंगाने पोलीस दलाची व कामाकाजाची शस्त्रे, डॉगरक्वॉड, सागरी सुरक्षा, डायल ११२, वायरलेस, सायबर गुन्हे, भरोसा, पोलीस ठाणेचे कामकाज व इतर माहितीचे प्रदर्शन ६ ते ८ जानेवारी कालावधीत जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे.
६ जानेवारी रोजी कणकवली येथील कणकवली बस स्टॅन्ड जवळ सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत तर कुडाळ येथील कुडाळ पोलीस ठाणे समोरील पटांगण येथे ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आणि ८ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील जगन्नाथ भोसले उद्यान येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.
