पूनम चव्हाण व मनोज मोंडकर यांनी यात्रेकरूंसाठी पुरवली मोफत बस सेवा…
⚡मालवण ता.२३-:ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते मनोज मोंडकर व मालवण तालुका महिला संघटक पूनम चव्हाण यांच्या सहकार्यातून मालवण शहरातील प्रभाग ९ मधून आंगणेवाडी यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध करण्यात आली. या सेवेचा प्रभागातील अनेक भाविकांनी लाभ घेतला. मनोज मोंडकर व पूनम चव्हाण यांच्या तर्फे सलग पाच वर्षे आंगणेवाडी यात्रेकरूंसाठी मोफत बस सेवा पुरविण्यात येत आहे….
