संजू परब यांचा कोलगावात भाजप-ठाकरे सेनेल जोरदार धक्का…

असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेत केला प्रवेश:महेश सारंग यांच्यासह सेनेला धक्का..

⚡सावंतवाडी ता.२३-: कोलगाव पंचायत समिती मधील भाजप व ठाकरे सेनेचे असंख्य पधिकारी, कार्यकर्ते यांनी आज शिवसेना संघटक, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला‌. कोलगावात महेश सारंग यांच्यासह ठाकरे सेनेला हा जोरदार धक्का मानला जात आहे.

आगामी स्थानिक निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी सावंतवाडी तालुक्यात जोरदार प्रवेश सुरू केले आहेत.

नुकतेच भाजपात उबाठा शिवसेनेचे मोठे प्रवेश झाले होते. यात आता शिवसेनेनं उबाठासह भाजपला धक्का दिला आहे. यावेळी भाजपचे दीनेश जाधव,शोबराज जाधव,रवी पवार,विकास जाधव,विजय चव्हाण,राकेश पवार, तर ठाकरे सेनेचे सुशांत ठाकुर, योगेश करमळकर,फिरोज शेख,न
नारयण निरगुन,खौरूनिसा खान,रेशमा करोल,शाहिन शेख,रोशन शेख आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page