भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०८-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित…

Read More

सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी प्रयोग करताना विशेष आनंद…

भाऊ कदम:नाटक ‘सिरियल किलर’ चा बॅ नाथ पै सभागृहात रसिकांच्या तुफान प्रतिसादात… ⚡सावंतवाडी ता.०८-: सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेसाठी प्रयोग करताना विशेष आनंद झाला. तुमच्या मनोरंजनातून सामाजिक हीत साधू शकलो याचा विशेष आनंद वाटतो असे प्रतिपादन अभिनेते भाऊ कदम यांनी केले. रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदुरच्या मदतीसाठी धमाल…

Read More

गोपुरी येथे रंगस्पर्श कार्यशाळा संपन्न…

कणकवली : नुकतीच गोपुरी आश्रमच्या कै. गणपतराव सावंत बहुउद्देशीय प्रशिक्षण संकुलात गोपुरी जीवन मूल्य शिक्षण शाळे मार्फत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी रंगाच्या माध्यमातून लहान मुलांचा व्यक्तिमत्व विकास असा प्रयोग “रंगस्पर्श” या नावे करण्यात आला. चित्रकार नरेंद्र राणे यांनी खास मेहनत घेऊन आणि जीवन मूल्य शिक्षण शाळेच्या उद्देशांशी सांगड घालत छोट्या मुलांना रंगाच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या…

Read More

आंगणेवाडी कडे जाणाऱ्या कणकवली आचरा रस्त्याचे काम धीम्या गतीने…

कणकवली : दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी ची यात्रा यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी होत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालेले असताना मात्र कणकवली ते आचरा मार्गावरून जाणारी वाहतूक यावर्षी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण कणकवली ते आचरा या मार्गावरील कणकवली भागातील आचरा रस्त्याचे काम अत्यंत धीम्या…

Read More

श्री काशीकलेश्वर मंदिराचा उद्या वर्धापन दिन…

कणकवली : कलमठ येथील श्री देव काशीकलेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवार ९ फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स. ९ ते १ वा. धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ५ वा. भजने, रात्री ८ वा. कलमठ गावातील महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काशीकलेश्वर…

Read More

लीना धुरीची अश्वमेध स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवड…

⚡मालवण ता.०७-:गडचिरोली येथे दि. १८ ते २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अश्वमेध स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात मालवणची सुकन्या लीना धुरी हिची ची ऍथलेटिक मधील ४०० मीटर या क्रीडा प्रकारात निवड झाली आहे. यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या संघात फक्त १२ मुलींची निवड झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लीना धुरी या एकमेव खेळाडू मुलीची मुंबई विद्यापीठाच्या संघात अश्वमेध या स्पर्धेसाठी…

Read More

वाळू धोरण हरकतींसाठी मुदतवाढ मिळावी…

रविकिरण तोरसकर यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.०७-:परिपूर्ण वाळू रेती निर्गती धोरण २०२५ बनविण्यासाठी अभ्यासपूर्ण सूचना आणि हरकती येण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित ग्रामपंचायती, वैयक्तिक लाभार्थी, व्यवसायिक, मच्छीमार, शेतकरी यांना सदरची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. अवघ्या सात दिवसांत हरकती…

Read More

दिल्लीतील संचलनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या राहुल चव्हाणचे मालवणात जंगी स्वागत…

⚡मालवण ता.०७-:नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निवड झालेला आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेला मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा विद्यार्थी राहुल चव्हाण याचे आज दिल्लीहून मालवणात आगमन झाल्यानंतर मालवण शहरातून त्याची भव्य गौरव रॅली काढण्यात आली. राहुल याने आपल्या कामगिरीने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान उंचावली असून याबद्दल राहुल…

Read More

झाराप येथे १० रोजी विश्वकर्मा प्रकटदिन…

वेंगुर्ला प्रतिनिधी-सिधुदुर्ग जिल्हा श्री विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्यातीने १० फेब्रुवारी रोजी झाराप येथील कार्यालयात श्री विश्वकर्मा प्रकटदिन आयोजित केला आहे.

Read More

पर्यटक मारहाण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा…

सकल हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन:कडक कारवाईचे पोलिसांची ग्वाही.. कुडाळ : गुरुवारी सकाळी झाराप झिरो पॉईंट येथे पर्यटकांना झालेल्या मारहाणीबाबत आज सकल हिंदू समाजच्या वतीने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ते चहाचे स्टॉल अनधिकृत असतील तर बंद करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते आज सायंकाळी…

Read More
You cannot copy content of this page