डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

⚡कुडाळ ता.१४-: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कुडाळ मध्ये विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली
भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र मुंबई  यांच्या वतीने डॉ  आंबेडकर यांच्या  पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. हा पुष्पहार भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र अध्यक्ष पंढरी चव्हाण, कोकण युवा नेते बाबल पावस्कर यांच्या हस्ते  घालण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण समाजाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत चव्हाण, ठाणे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ चव्हाण ,भारत पेंडूरकर, नंदकिशोर तेडोलकर, लक्ष्मी तेडोलकर,  रमेश कुडाळकर, गुरू पेंटर, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण म्हणाले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना करताना सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे . आज त्यांच्यामुळेच आपला समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अन्न वस्त्र व निवारा या मूलभूत गरजापासून ते मानवी अधिकारापासून दूर असणाऱ्या व्यक्ती समूह व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांचे हे कार्य अधिक बलवान होणे काळाची गरज आहे. लोकशाही केवळ यंत्रणेचा भाग नसून लोकशाहीचे सामाजिककरण झाले पाहिजे असा त्यांचा विचार होता . कारण लोकशाही हा जीवन मार्ग आहे असे त्यांचे मत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका व्यक्तीसाठी अगर समाजासाठी नव्हते तर ते देशातील सर्व वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या बाजूचे होते. मानवी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात तो एक भाग होता म्हणून आपण त्यांना मानवी मुक्तीचे नेते म्हणून ओळखतो.
दरम्यान कुडाळ तालुक्यात डॉ आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध सामाजिक सांस्कृतिक आदी विविध उपक्रमांनी गावा गावात साजरी करण्यात आली

You cannot copy content of this page