⚡सावंतवाडी ता.१४-: दशावताराला शेकडो वर्षांची परंपरा असून भाई शिर्केंसह अन्य कलाकार ही परंपरा जपत आहेत. त्यांचा मुलगाही उत्कृष्ट कलाकार आहे. समाजात वावरताना समाज उपयोगी कामे करावी लागतात. डॉ. ऐवळेंचे काम डोंगराएवढे आहे. त्यांनी दोडामार्गमधील लोकांना जीवनदान देण्याचे काम केले असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी काढले.
अश्वत्थ मारूती भक्त मंडळ आयोजित बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग रविवारी आयोजित करण्यात आला होता. याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. परब बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, भाई शिर्के, अशोक पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या शुभारंभ प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, दशावतार नाट्य मंडळाचे मालक भाई शिर्के, सत्यवान बांदेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अशोक पेडणेकर, मांगिरीश रांगणेकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू मिशाळ, अर्चित पोकळे, किशोर चिटणीस, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, गौतम माठेकर, पांडूरंग वर्दम, देवेश पडते, विशाल चव्हाण आदी माठेवाडा, जुनाबाजार येथील नागरिक उपस्थित होते. यावेळी आभार देव्या सुर्याजी यांनी मानले.
