राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे आवाहन..
कणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे दलित, वंचित, शोषितांना न्याय व हक्क मिळाले. डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहून सर्वांना समान हक्क, कर्तव्ये, जबाबदारी मिळवून दिल्या आहेत. भारत देश संविधानानुसार चालतो. आंबेडकर यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांच्या आचार व विचारांचे अनुकरण तरुण पिढीने करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बुद्ध विहार येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, खजिनदार राजू वर्दम, उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, कणकवली शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सरचिटणीस सचिन अडुळकर, सत्यविजय परब, मुश्ताक काझी, सईद काझी, सलीम शेमना, उदय सावंत, जाहीर फकीर, बाळू मेस्त्री, पदवीधर सेल मतदारसंघ अध्यक्ष महेश चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, बाबा साळवी यांच्या आंबेडकर यांचे अनुयायी उपस्थित होते.
