तेंडोली येथील रवळनाथ पंचायतनच्या वर्धापन दिनानिमित्त २१ पासून विविध कार्यक्रम…
कुडाळ : तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा दि. २१ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.दि. २१ रोजी दुपारी ३ वाजता ग्राम देवतेस श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालणे, तरंग स्वरूप देव नेसवणे, पाषाणे सजविणे, तरंगाना वस्त्रालंकार, सायंकाळी ७ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ…
