कुडाळ : तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा दि. २१ ते २५ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. २१ रोजी दुपारी ३ वाजता ग्राम देवतेस श्रीफळ ठेऊन गाऱ्हाणे घालणे, तरंग स्वरूप देव नेसवणे, पाषाणे सजविणे, तरंगाना वस्त्रालंकार, सायंकाळी ७ वाजता तेंडोलकर दशावतार मंडळ (झाराप) यांचे नाटक, रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स, दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता श्री देव रवळनाथ चरणी ऋग्वेदसंहिता अभिषेक,संकल्प, पुण्याहवाचन, स्थल शुद्धी,देवतास्थापन, अग्निस्थापन, ग्रहयज्ञ, ७.३० वाजता पंचायतन यागानुष्ठान, दुपारी १ वाजता नैवेद्य, प्रसाद, सांयकाळी ५ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९ वाजता श्री देव रवळनाथ मंडळ (तेंडोली) यांचे ऐतिहासिक “नेक जात मराठा” संगीत नाटक, दि. २३ रोजी सकाळी ७ वाजता स्थापित देवता पुजन, श्री महादेव मंदिरात लघुरुद्र, श्री जगदंबा भद्रकाली मंदिरात देवीसूक्त अभिषेक, दुपारी १.३० वाजता नैवेद्य, आरती, प्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री देव रवळनाथ दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे “पुर्नजन्म अर्थात भद्रसेन महानंदा” नाटक, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, १० वाजल्यापासून एकांकीका- शिवप्रेमी मित्रमंडळ (तेंडोली) यांची चावी कुठे ?, कलांकुर ग्रुप (तेंडोली) यांची कर्तव्य, कलांकुर ग्रुप (आंबेडकरनगर) यु टर्न एकांकीका सादर होईल.
दि. २४ रोजी सकाळी ७ वाजता श्री वेतोबा, श्री गावडोबा, श्री दांडेकर मंदीरात नित्य अभिषेक, यज्ञमंडपात स्वाहाकार सेवा,सकाळी ११.३० वाजता बलीदान, दुपारी १२ वाजता पुर्णाहुती, अभिषेक, धार्मिक कार्याची सांगता, दुपारी १ वाजता उपहार नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली) यांचे नाटक, रात्री ८ वाजता पालखी प्रदक्षिणा, ९.४५ वाजता ऋणनिर्देश, रात्री. १० वाजता श्री दामोदर आशिर्वाद संघ प्रस्तुत आणि सचिन तेंडुलकर निर्मित दोन अंकी मराठी विनोदी नाटक ‘भुल भुलैया’, दि. २५ रोजी सकाळी ९ वाजता स्वारीचे सातेरी मंदिरात मांडावर आगमन, संचार, आशीर्वादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे, उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसामिती (तेंडोली) आणि सर्व पंचायतनप्रेमी भक्तजन यांनी केले आहे.
तेंडोली येथील रवळनाथ पंचायतनच्या वर्धापन दिनानिमित्त २१ पासून विविध कार्यक्रम…
