Headlines

तरंदळे कुंदेवाडी पाईपलाईनचा सर्व्हे करून कार्यवाही करणार !

लघु पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांचे उपरकर यांना आश्वासन. कणकवली : लघुपाटबंधारे विभागाच्या तरंदळे धरणातून कुंदेवाडी येथील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणारी पाईप लाईन ठराविक शेतकऱ्यांची कबुली घेऊन करण्यात आली आहे. तसेच चारफूट जमिनीतून येणाऱ्या पाईपमधून पुढे शेतकऱ्यांनी पाणी पाटातून घ्यावयाचे आहे. पण ते कशाप्रकारे मिळणार याबाबत कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर सर्व्हेद्वारे शेतकऱ्यांना हे दाखवून नंतरच…

Read More

बांदा उड्डाणपुलाचे उद्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण…

⚡बांदा ता.११-: मुंबई गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण सोमवार दिनांक १२ रोजी दुपारी २ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.गेली दोन वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरु होते. उड्डानपुल पूर्ण झाल्याने शहरातील चौकात होणारी वाहतूक कोंडी टळणार आहे तसेच अपघातांची मालिका देखील थांबणार आहे. दोन वर्षात या…

Read More

शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: छत्रपतींच्या राजकोट येथील पुतळ्याचे दर्शन व पूजन.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-: छत्रपती शिवाजी महाराज हे महान योध्दा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला असून महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांना स्फुर्तीदायक ठरणार असल्याचे, प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर…

Read More

गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन;गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.. ⚡सिंधुदुर्ग दि.११-: शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करंजे–साटमवाडी (ता. कणकवली) येथे ७० एकर जागेत उभारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळा कोकण प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या…

Read More

गोवर्धन गोशाळेने प्रेरित होऊन उद्योजक निर्माण व्हावेत-:खासदार नारायण राणे…

कणकवली : गाय म्हणजे प्रगती.गायीला आपण माता मानतो. मागील 3 वर्षे करंजे येथील माळरानावर आम्ही गोवर्धन गोशाळेची मुहूर्त मेढ रोवली.आज गोशाळेत देशातील दीडशे विविध जातीच्या गायी आहेत. कोणती गाय किती लिटर दुध देते.कोणत्या गायीचे तूप चढ्या दराने विकले जाते याचे मार्गदर्शन येथे मिळणार. शेण शेतकऱ्यांकडून 5 रुपये किलो आणि गोमूत्र 8 रुपये लिटर दराने विकत…

Read More

गोवर्धन गोशाळा करंजे कणकवली चे झाले शानदार उद्घाटन…

⚡कणकवली ता.११-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ,माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खासदार नारायण राणे यांच्या करंजे येथील गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आगमन झाले. नीलम राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,आमदार रवींद्र फाटक,माजी आमदार प्रमोद जठार ,माजी आमदार राजन साळवी,माजी आमदार प्रवीण भोसले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, यांच्यासह जिल्हाधिकारी…

Read More

गवा रेड्याच्या हल्ल्यात चौकुळ येथील प्रौढ गंभीर जखमी…

⚡आंबोली ता.११-: चौकुळ मधलीवाडी येथील काळकादेवी येथे घराशेजारी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या जगन्नाथ साबा गावडे (वय ६०) हे गवारेडयाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . ही घटना रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गावडे यांच्या घरापासून सुमारे ५० मीटर अंतरावर काळकादेवी…

Read More

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सावंतवाडीत शिवसेनेतर्फे तिरंगा रॅली…

सावंतवाडी: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी सावंतवाडी शहरात शिवसेनेतर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी भारत माता की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यांमध्ये तिरंगा रॅलीचे…

Read More

असलदे ओझरम कॉजवे दशक्रोशीला जोडणार…

दिलीप तळेकर:असलदे येथे कॉजवेच्या कामाचे भूमिपूजन.. कणकवली : पियाळी नदीवरील असलदे बौध्दवाडी, दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामासाठी ९३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कॉजवेवरुन ये – जा करण्यासाठी नागरिकांना सोयीचे होणार आहे. या नदीवरील कॉजवे ( साकव )…

Read More

करंजे येथे आज गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन…

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची उपस्थिती.. कणकवली : तालुक्यातील करंजे येथील गोवर्धन गोशाळेचे उ‌द्घाटन रविवार, ११ मे रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार नीलेश राणे, शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्गच्या अध्यक्षा…

Read More
You cannot copy content of this page