दिलीप तळेकर:असलदे येथे कॉजवेच्या कामाचे भूमिपूजन..
कणकवली : पियाळी नदीवरील असलदे बौध्दवाडी, दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामासाठी ९३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या कॉजवेवरुन ये – जा करण्यासाठी नागरिकांना सोयीचे होणार आहे. या नदीवरील कॉजवे ( साकव ) दशक्रोशीतील गावांना जोडणार असल्याचा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांनी दिला आहे.
असलदे दिवानसानेवाडी येथे पियाळी नदीवरील असलदे बौध्दवाडी, दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामाचा श्रीफळ वाढवून भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, ग्रा.पं.सदस्य आनंद तांबे, सोसायटी संचालक उदय परब , परशुराम परब, शत्रुघ्न डामरे, सुरेश मेस्त्री, सतिश पांचाळ, महेश लोके, मधुसुदन परब, दीपेश परब, आत्माराम घाडी, बाबू जांभळे, बाबल पांचाळ आदींसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भगवान लोके म्हणाले , गावातील ग्रामस्थांचे गेल्या अनेक वर्षांपासून कॉजवे बांधण्यासाठी मागणी होती. त्यानुसार माजी सभापती दिलीप तळेकर यांनी पाठपुरावा करत या कॉजवेला मंजुरी मिळवली आहे. ख-या अर्थाने समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करुन दिल्यासाठी गावाच्यावतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.
यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सरपंच चंद्रकांत डामरे व उदय परब यांच्या हस्ते दिलीप तळेकर यांना पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर असलदे चव्हाटा ते विठ्ठल मंदीर जाणा-या रस्त्याचे लोकार्पन करण्यात आले.
