Headlines

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश…

केटी बंधाऱ्याच्या प्लेट काढायला सुरुवात.. कणकवली : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज सकाळी केटी बंधाऱ्याच्या पहाणी केली होती. दरम्यान उन्हाळ्यात घातलेल्या लोखंडी प्लेट तशाच असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी अतिवृष्टी होऊन। पाणी नागरिकांच्या शेतात, घरांत शिरले तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला होता. सुशांत नाईक यांच्या मागणीची दखल घेऊन लघु पाट बंधारे…

Read More

लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा…

भाजपा तालुका कणकवली चे आयोजन.. कणकवली : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शोर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेप्रती असलेली तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कामामधील सहभाग यामुळे त्या एक आदर्श शासिका आणि जनसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनातून…

Read More

कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्याच्या प्लेट न काढल्याने नदीचे पाणी भरवस्तीत घुसण्याची शक्यता…

नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास याला जबाबदार कोण..?:युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घटनास्थळी जात केली पाहणी.. ⚡कणकवली ता.२३ -: शहरातील कनकनगर व शिवशक्तीनगर येथील केटी बंधाऱ्याला उन्हाळ्यात पाणी अडवण्यासाठी घातलेल्या प्लेट लघु पाटबंधारा विभागाने न काढल्याने नदीने रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे पाणी भरवस्थित घुसण्याची भीती येथील नागरिकांच्या मनात आहे. नदीने आपली पातळी ओलांडून पाणी नागरिकांच्या…

Read More

जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.२४-: जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंजिरी मनोहर कांबळे, मनोहर शरद कांबळे, प्रशांत सुभाष साटेलकर, मोतीराम विलास साटेलकर,* सर्व रा.साटेली यांच्याविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. देशमुख मॅडम यांनी सबळ पुरावा अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी यांचे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश प्रकाश चव्हाण, अॅड. दत्तप्रसाद विश्वास ठाकूर, अॅड. केतन जाधव यांनी काम पाहिले. सदर…

Read More

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे…

पालकमंत्री नितेश राणे:महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार.. ⚡ओरोस ता २४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने…

Read More

महावितरणच्या वेंगुर्ले कार्यालयातील दोन अभियंता निलंबित…

आपत्कालीन परिस्थितीमद्ये कामात कसूर केल्याचा ठपका.. वेंगुर्ले:आपत्कालीन परिस्थिती असताना आणि मुख्यालय सोडू नये असे आदेश असताना कार्यालयात गैरहजर राहून कामात कसूर केला म्हणून महावितरण कंपनीचे उपविभाग वेंगुर्ले येथील उपकार्यकारी अभियंता अंकुश विजयराव कौरवार आणि शहर सहाय्यक अभियंता सचिन सखाराम उकंडे उकंडे या दोन अधिकाऱ्यांना महावितरणचे सिंधुदुर्ग मंडळ अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी अरविंद वनमोरे यांनी…

Read More

पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांना मातृशोक…

मालवण, दि प्रतिनिधी: मालवण शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय -६७) यांचे काल रात्री वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. आज सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवणचे पत्रकार प्रशांत हिंदळेकर, साईश्रद्धा मोबाईल शॉपीचे मालक दीपक हिंदळेकर यांची ती आई होय.

Read More

BSNL नेटवर्क सेवा सुरळीत करा अन्यथा टाळे ठोकणार…

कळसुली सरपंच सचिन पारधीये यांचा इशारा.. कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील बीएसएनएल टॉवरची सेवा गेले तीन दिवस ठप्प आहे. कळसुली गावात बीएसएनएल नेटवर्क शिवाय कोणत्याही टॉवरचे नेटवर्क येत नसल्याने गावातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, बँक, पोस्ट, आदींना गावात नेटवर्क नसल्याने मोठा फटका गावातील नागरिकांना बसत आहे. लवकरात लवकर जर…

Read More

बांदा-सटमटवाडी रस्ता ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्ता चिखलमय…

मान्सून सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत न बनवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा.. ⚡बांदा ता.२४-: बांदा-सटमटवाडी रस्ता ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपूर्ण राहिल्याने अवकाळी पावसात हा संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे. या रस्त्यावरून वाहतूक तर सोडाच पण चालणेही मुश्किल बनल्याने सटमटवाडी ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. मान्सून सुरू होण्यापूर्वी हा रस्ता पूर्ववत न बनवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा…

Read More

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक…

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यु सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज, शनिवार, २४ मे रोजी सकाळी ९ वाजता उपरलकर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.मंगेश…

Read More
You cannot copy content of this page