माजगाव परिसरात अवकाळी पाऊस…

आंबा व काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता *💫सावंतवाडी दि.०४-:* माजगाव परिसरात आज दुपारी तुरळक स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेले दोन दिवस वातावरणात थंडी गायब होऊन गर्मीचे प्रमाण वाढले होते. तसेच ढगाळ वातावरणही होते….

Read More

कणकवली झेंडा चौक येथे बाजारपेठेस आग

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली बाजरपेठेत पहाटे 3 वा च्या सुमारास आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊसचे दुकान जळून खाक झाले असून त्या शेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी आले तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही आगीची झळ पोहचली .कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक…

Read More

युवक काँग्रेसतर्फे ज्येष्ठ शिक्षिका वासंती कांदळगावकर यांचा सन्मान

*💫मालवण दि.०३-:* भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव करून देणार्‍या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या कुडाळ – मालवण विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या वतीने मालवणात गेली अनेक वर्ष लहान मुलांना अभ्यास शिकविणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका वासंती कांदळगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वासंती कांदळगावकर या अनेक वर्षे मालवण शहरात लहान…

Read More

बचतगट अपहार प्रकरणातील तिसरी महिला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात

तीनही महिलांना तिन दिवसांची पोलिस कोठडी *💫कुडाळ दि.०३-:* बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणी तिसरी महिला प्रियांका पांडुरंग राऊळ (रा. शिवापूर) हिला कुडाळ पोलिसांनी शनिवारी अटक केली. याप्रकरणातील तीनही महिलांना न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जागृती प्रभाग संघ घावनळेच्या अध्यक्षा सौ समिधा सचिन घावनळकर, कोषाध्यक्षा कोमल कोरगावकर सचिव प्रियांका राऊळ व…

Read More

सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने साजरी करण्यात आली. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी केले….

Read More

कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने कविता लेखिका कविता शिर्के यांचा गौरव…

समाज साहित्य संघटनेकडून करण्यात आला गौरव *💫कणकवली दि.०३-:* मराठी साहित्यात आज चांगली कविता लिहिली जात आहे. बहिणाबाई ते आजच्या शरयू आसोलकर यांच्यापर्यंत कवयित्रींनी मराठी कविता समृद्ध केलेली आहे. हाच गुणवत्तेचा धागा पकडून कवयित्री कविता शिर्के कविता लेखन करत आहेत. त्यामुळे त्यांना समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्काराने गौरवण्यात आले. कवितेचा आवाज सतेच्याही…

Read More

प्रा. वैभव खानोलकर व पप्पू नांदोस्कर यांना पुरस्कार जाहीर

*💫वेंगुर्ला दि.०३-:* पंचशील ट्रस्ट ओरोसच्यावतीने कालकथित बळवंत खोटलेकर गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्कार यावर्षी खानोली येथील प्रा.वैभव खानोलकर व वायंगणी येथील दशावतारी कलावंत पप्पू नांदोसकर यांना जाहीर झाले आहेत. कोविड-१९च्या काळात शाळा बंद असताना प्रा. खानोलकर यांनी वक्तृत्व, निबंध, काव्य लेखन, काव्यवाचन आधी विविध स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धात यश…

Read More

आभासी योग स्पर्धेत खर्डेकरच्या विद्यार्थ्यांचे यश

*💫वेंगुर्ला दि०३-:* मुंबई विद्यापिठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज, तळेरे येथे ‘विश्वविजयोत्सव‘ या क्रिडा महोत्सवांतर्गत जिल्हास्तरीय आभासी योग स्पर्धेत मारिया आल्मेडा, हर्षा खवणेकर व कस्तुरी शेटये या खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेत तीन प्रकारचे गट होते. प्रत्येक योगासनात आसन स्थितीत एक मिनिट स्थिर रहाणे आवश्यक होते. द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थीनी मारिया आल्मेडा हिने…

Read More

अन्याया विरोधात आक्रमक बना

सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे *💫मालवण दि.०३-:* अन्याय सहन करणे म्हणजे अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. या साठी अन्यायाविरुद्ध झाशीच्या राणी सारखे आक्रमक बनून अन्याया विरोधात उभे रहा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. आचरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हायस्कूल मधील मुलांमध्ये बाललैगिक शोषण, महिलांवरील अत्याचार, सायबर गुन्हे…

Read More

लोरे येथील साळकोंड येथील महिला बचत गटाने श्रमदानातून बांधला बंधारा

कणकवली-:लोरे गावातील शिवगंगा नदीपात्रातील साळकोंड येथे महिला बचत गटाने श्रमदानातून बंधारा बांधला.राष्ट्रीय हरितसेना व समाजसेवा अंतर्गत बचत गटाला पाण्याचे महत्त्व विषद करण्यात आले.वैवाहिक जीवनात जडलेली श्रमदानाची सवय व परस्पर सहकार्यातून काम करण्याची भावना या सारख्या कार्यक्रमातून वृदिध्नगत होत असते.या बंधाऱ्याच्या माध्यमातून साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास व पर्यायाने पिण्याचे पाणी व शेतीस उपयोग होणार…

Read More
You cannot copy content of this page