*💫वेंगुर्ला दि.०३-:* पंचशील ट्रस्ट ओरोसच्यावतीने कालकथित बळवंत खोटलेकर गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे पुरस्कार यावर्षी खानोली येथील प्रा.वैभव खानोलकर व वायंगणी येथील दशावतारी कलावंत पप्पू नांदोसकर यांना जाहीर झाले आहेत. कोविड-१९च्या काळात शाळा बंद असताना प्रा. खानोलकर यांनी वक्तृत्व, निबंध, काव्य लेखन, काव्यवाचन आधी विविध स्पर्धेत आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धात यश संपादन केले आहे. तर नांदोस्कर यांनी दशावतार लोककलेच्या माध्यमातून आपल्या अभिनय आणि संवाद कौशल्यातुन रसिक हृदयात स्थान मिळवित रावण, परशुराम, भिष्म, दक्ष, इंद्र आदी भुमिका साकारत रसिकामध्ये आपले नविन ओळख निर्माण केली आहे. लवकरच हे पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत दिले जाणार असल्याची माहिती पंचशिल ट्रस्टचे अध्यक्ष संजय खोटलेकर यांनी दिली आहे.
प्रा. वैभव खानोलकर व पप्पू नांदोस्कर यांना पुरस्कार जाहीर
