लोरे येथील साळकोंड येथील महिला बचत गटाने श्रमदानातून बांधला बंधारा

कणकवली-:लोरे गावातील शिवगंगा नदीपात्रातील साळकोंड येथे महिला बचत गटाने श्रमदानातून बंधारा बांधला.राष्ट्रीय हरितसेना व समाजसेवा अंतर्गत बचत गटाला पाण्याचे महत्त्व विषद करण्यात आले.वैवाहिक जीवनात जडलेली श्रमदानाची सवय व परस्पर सहकार्यातून काम करण्याची भावना या सारख्या कार्यक्रमातून वृदिध्नगत होत असते.या बंधाऱ्याच्या माध्यमातून साचलेल्या पाण्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास व पर्यायाने पिण्याचे पाणी व शेतीस उपयोग होणार आहे.या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य श्री.मनोज रावराणे,गावचे सरपंच अजय रावराणे,माजी सरपंच श्री.सुमन गुरव,माजी उपसरपंच श्री.नरेश गुरव,श्री कृष्णा गुरव,श्री हरिचंद्र जाधव आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page