माजगाव परिसरात अवकाळी पाऊस…

आंबा व काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता

*💫सावंतवाडी दि.०४-:* माजगाव परिसरात आज दुपारी तुरळक स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेले दोन दिवस वातावरणात थंडी गायब होऊन गर्मीचे प्रमाण वाढले होते. तसेच ढगाळ वातावरणही होते. पाऊस येणार हे नक्की असताना आज दुपारच्या सुमारास माजगाव परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच सावंतवाडी शहरातही ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page