युवक काँग्रेसतर्फे ज्येष्ठ शिक्षिका वासंती कांदळगावकर यांचा सन्मान

*💫मालवण दि.०३-:* भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाची, सामर्थ्याची जाणीव करून देणार्‍या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त युवक काँग्रेसच्या कुडाळ – मालवण विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी यांच्या वतीने मालवणात गेली अनेक वर्ष लहान मुलांना अभ्यास शिकविणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका वासंती कांदळगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वासंती कांदळगावकर या अनेक वर्षे मालवण शहरात लहान मुलांसाठी शिकवणी घेत असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील मुले देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून आज विविध क्षेत्रात काम करत आहेत व अनेक मुले आजही अभ्यास करत असून शिक्षणाप्रमाणे सामाजिक दृष्टीने देखील त्या मार्गदर्शन करत असतात. स्त्री ही स्व:कर्तुत्वाने घराला व समाजाला एक आदर्श निर्माण करून देत असते त्या प्रमाणे वासंती कांदळगावकर या देखील आपलं काम समाजात निस्वार्थी पणे बजावत असल्याने युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आजचा दिवस सावित्रीबाई फुलेंच्या आठवणीने एका होतकरू नव स्त्रीचा सन्मान हा माझ्या साठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सत्कारमूर्ती वासंती कांदळगावकर यांनी सांगितले. यावेळी पल्लवी तारी यांच्यासह युवक जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, बाळू अंधारी, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, युवक शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, सरदार ताजर, नीलम करंगुटकर, मृणाल कांबळी, ममता तळगावकर, योगेश्वर कुर्ले, इशा चव्हाण आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page