औटघटकेच्या राज्यांकडून मागासवर्गीयांच्या मध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न
जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा आरोप *ð«सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की मागासवर्गीयांना विशेषतः नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का ? याप्रकरणी गेली ६६ दिवस घंटानाद आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन दडपण्यासाठी, मागासवर्गीयांना न्याय मिळू नये म्हणून हरि पांडुरंग कसालकर नावाच्या तोतयाच्या नावाने खोटा तक्रार अर्ज सीईओ, पोलिस अधीक्षक, कलेक्टर, कोकण विभागीय…
