*💫मालवण दि.२२-:* जिल्हा परीषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या स्वनिधीमधून व पंचायत समिती माजी सभापती सोनाली कोदे-तळाशिलकर यांच्या प्रयत्नातुन मंजूर झालेल्या रेवंडी तांडेलवाडी रस्त्याचे भूमिपुजन सरपंच सौ प्रिया प्रकाश कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.समिती माजी सभापती सोनाली कोदे-तळाशिलकर, उपसरपंच श्यामसुंदर तळाशिलकर, ग्रा.सदस्य युवराज कांबळी , प्रज्वला चेंदवणकर,ग्रामसेविका चेंदवणकर मॅडम, माजी सरपंच अनिता तळाशिलकर व विलास चेंदवणकर ,अमोल वस्त, अरूण कांबळी, प्रथमेश करलकर, हरी कांदळगावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रेवंडी तांडेलवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपुजन…
