Headlines

औटघटकेच्या राज्यांकडून मागासवर्गीयांच्या मध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न

जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा आरोप

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२२-:* सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की मागासवर्गीयांना विशेषतः नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का ? याप्रकरणी गेली ६६ दिवस घंटानाद आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन दडपण्यासाठी, मागासवर्गीयांना न्याय मिळू नये म्हणून हरि पांडुरंग कसालकर नावाच्या तोतयाच्या नावाने खोटा तक्रार अर्ज सीईओ, पोलिस अधीक्षक, कलेक्टर, कोकण विभागीय आयुक्तां कडे दाखल केल्याचे सिद्ध झाले. आंदोलनाच्यावेळी संरक्षण खात्याचे अधिकाऱीही सांगत होते की, तुझ्या विरोधात तक्रार दाखल झाली असून तुझी कायमची पेन्शन बंद करणार , तेव्हा रावजी यादव यांनी तक्रार अर्जाची प्रत मागणी केली ती ते देईनात म्हणून रावजी यांनी जिल्ह्याचे प्रमुख सीईओ, कलेक्टर,एसपी यांच्याकडे केंद्रीय माहिती अधिकारात अर्ज करुन तो तक्रार अर्ज मिळविला. रावजी यादव म्हणतात की माझे आंदोलन हे कोणत्या ही राजकीय पक्षांच्या विरोधात नाही की कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही तर राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाने दिलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जातीयवादी प्रशासकीय अधिकारी करत नाहीत म्हणून. हा तोतया तोच असणार जो आंदोलनाच्या वेळी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू असताना मी वंचित पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे, तुम्हाला न्याय कसा मिळतो ते मी बघतो, असा बडबडत होता, त्यावेळी होमगार्ड ही होते, मी त्याला त्याचे नांव, गाव विचारले तर तो सांगायला तयार नाही. तो असाही म्हणायचा,मी पराडकर साहेब, भिसे सायबांचा माणूस आहे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष्या आमच्याच आहेत, सीईओ आमच्या बाहेर नाहीत, असा बडबडत होता. मी त्याच्या वयावरुन दुर्लक्ष केले कारण तो वेडा असावा असे समजून गेलो. परंतू जेव्हा संरक्षण अधिकारीच सांगू लागले की तुझी पेन्शन बंद होणार. जागा हो आंदोलन थांबव, मी दुर्लक्ष केले. परंतू या औटघटकेचे राजेंनी पेपरात आपली लाल केली तेव्हा च मी माहिती अधिकारात या तिन्ही अधिकारी यांना अर्ज केला. तेव्हा हे उघड झाले. असा प्रकार यापूर्वी ही मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेचे काम करत असताना तथाकथित स्वयंघोषितांनी प्रयत्न केला होता. लवकरच जिल्हा न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी आपल्या प्रसिध्दीपत्रकामध्ये म्हटले आहे.

You cannot copy content of this page