जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी,दि.२३-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ७७१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

वेंगुर्ला नगरवाचनालयात उद्या ग्रंथप्रदर्शन…

*💫वेंगुर्ला दि.२३-:* राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी शासनातर्फे दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात रविवार २४ जानेवारी रोजी ग्रंथालयाच्या कामकाजाच्या वेळेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये कथा,…

Read More

कांदळगावातील विकास कामांबाबत वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष…

*💫मालवण दि.२३-:* कांदळगाव मधील रस्ते दुरुस्ती व इतर विकासकामे होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच कांदळगाव पर्यटन दृष्ट्या देखील पुढे येत असून गावात हाऊस बोटिंग, मत्स्यपालन खेकडा पालन आदी प्रकल्प पर्यटन निधीमधून मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी कांदळगावचे सुपुत्र तसेच भारतीय कामगार सेना महासंघ चिटणीस व परब मराठा समाज सरचिटणीस जी. एस. परब यांनी पालकमंत्री उदय…

Read More

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी…

सुभेदार मेजर प्रकाश रॉय *💫वैभववाडी दि.२३-:* नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांच्या साठी प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान व शौर्य महत्त्वपूर्ण आहे, म्हणून त्यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ या नावाने साजरी केली जाते, असे मत सुभेदार मेजर प्रकाश रॉय, 58 महाराष्ट्र बटालियन, एन. सी. सी. ओरस सिंधुदुर्ग यांनी व्यक्त केले राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय…

Read More

त्रिंबक येथे ब्राह्मण ज्ञाती बांधव स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

*💫मालवण दि.२३-:* मालवण तालुक्यातील ब्राह्मण ज्ञाती बांधवांचा स्नेहमेळावा त्रिंबक येथे नुकताच संपन्न झाला. यावेळी उपस्थित वक्त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण तालुका ब्राम्हण मंडळाचे उपाध्यक्ष यशवंत सरजोशी तर प्रमुख अतिथी म्हणुन वेदमुर्ती सचिन भाटवडेकर, भालचंद्र वझे उपस्थित होते. गणेश पुजन व गो पुजनाने संमेलनाचा शुभारंभ झाला. यावेळी तालुक्यातील…

Read More

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची निवड…

सिंधुदुर्ग काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी भेट घेऊन दिल्या शुभेच्छा… *💫सावंतवाडी दि..२३-:* महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा पदग्रहण समारंभ प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांच्या प्रमुख उपस्थितित यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे पार पडला. या…

Read More

चिंदर, आडवली येथील नूतन ग्रा.पं.सदस्यांचा आ. वैभव नाईक यांनी केला सत्कार…

*💫मालवण दि.२३-:* मालवण तालुक्यातील चिंदर व आडवली ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. नूतन ग्रामपंचायत सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. चिंदर गावडेवाडी येथे नूतन ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, रिया घागरे, नम्रता महंकाळ, जान्हवी घाडी, निलेश रेवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मालवण नगरसेवक मंदार केणी,…

Read More

नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

कणकवली पोलिसांकडून आरोपी गजाआड;आरोपीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल *💫कणकवली दि.२३-:* नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी रतनू कांबळे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीला ताब्यात घेताना तपासी अंमलदार अधिकाऱ्यांना अडवणूक केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा आरोपीवर दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. कणकवली शहरात दुकानात काम करणाऱ्या एका…

Read More

विनिता आडारकर यांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार…

*💫वेंगुर्ला दि.२२-:* रेडीच्या मुख्याध्यापिका विनिता आडारकर यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनिता आडारकर यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सलग ३४ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले असून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले आहे. तसेच त्यांनी गुणवत्ता, शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, इतर स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन त्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात…

Read More

कांदळगाव मसुरे रस्त्याची दुरावस्था ..!

१ कोटी ९६ लाख रुपये खर्चाची निविदा निधी अभावी रखडली;आमदार, खासदारांकडुन आश्वासनांची खैरात. *💫मालवण दि२२-:* वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असा ओळखला जाणारा मालवण तालुक्यातील ओझर -कांदळगाव-मसुरे- बांदिवडे ते आडवली रस्ता पुर्णत: खड्यात गेल्याने वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वाहने नादुरुस्त होण्या बरोबरच अनेक छोटे मोठे अपघात वाहन घसरुन तसेच अरुंद रस्त्यामुळे नियमीत होत आहेत. सत्ताधारी आमदार व…

Read More
You cannot copy content of this page