कांदळगावातील विकास कामांबाबत वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष…

*💫मालवण दि.२३-:* कांदळगाव मधील रस्ते दुरुस्ती व इतर विकासकामे होण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. तसेच कांदळगाव पर्यटन दृष्ट्या देखील पुढे येत असून गावात हाऊस बोटिंग, मत्स्यपालन खेकडा पालन आदी प्रकल्प पर्यटन निधीमधून मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी कांदळगावचे सुपुत्र तसेच भारतीय कामगार सेना महासंघ चिटणीस व परब मराठा समाज सरचिटणीस जी. एस. परब यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. कांदळगावच्या विकास कामांसंदर्भात कांदळगावचे सुपुत्र तसेच भारतीय कामगार सेना महासंघ चिटणीस व परब मराठा समाज सरचिटणीस जी. एस. परब यानी पालकमंत्री उदय सामंत यांची मंत्रालय येथे भेट घेत निवेदन दिले. यामद्ये प्रामुख्याने कांदळगाव काजरटवाडी देऊळवाडी, तेलीवाडी रस्ता खदीकरण व डांबरीकरण, कांदळगाव साळकरवाडी वर्दम घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण, कांदळगाव महान आंगणेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ही कामे जिल्हा नियोजन मधुन होण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच निधी अभावी रखडलेला ओझर- कांदळगाव- मसुरे रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. कांदळगाव हे पर्यटन दृष्ट्या विकसीत होत असून साळकरवाडी ते देऊळवाडी पर्यंत जाणारा नदी किनारा लाभले आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी हाऊस बोटिंग सेवा व रोजगाराच्या दृष्टीने मत्सपालन,खेकडा पालन, सुरु केल्यास रोजगार उपलब्ध होण्या बरोबरच पर्यटकांचा ओघ सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे पर्यटन निधीमधुन सदर प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी या निवेदनात केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यानी याबाबत सकारात्मकता दाखवत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासीत केल्याची माहीती जी. एस. परब यानी दिली आहे.

You cannot copy content of this page