नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार

कणकवली पोलिसांकडून आरोपी गजाआड;आरोपीवर शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल

*💫कणकवली दि.२३-:* नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपी रतनू कांबळे याला पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपीला ताब्यात घेताना तपासी अंमलदार अधिकाऱ्यांना अडवणूक केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा आरोपीवर दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली. कणकवली शहरात दुकानात काम करणाऱ्या एका युवतीला रतनू कांबळे याने नोकरीचे आमिष दाखवत जवळीक वाढवली होती. त्यानंतर युवतीवर शारीरिक अत्याचारही केला होता. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार रतनू कांबळे वर भा दं वि ३७६ व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी आरोपीला चतुर्भुज केले. मात्र पोलीस ताब्यात घेत असताना आरोपी रतनू याने अडथळा आणला अशी फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल असून आरोपी रतनू यांच्याविरोधात भा दं वि ३५३ नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुपारी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

You cannot copy content of this page