महावितरणने कोणाच्याही घरातील, दुकानातील वीज जोडणी कापल्यास महावितरणची तार कापू

मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा इशारा *💫मालवण दि.२३-:* कोरोना पार्श्वभूमीवर लाॕकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वीज वितरण कंपनीने ग्राहकांना मीटर रीडींगद्वारे वीजबील न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता लाॕकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची वीजबीले येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून होत आहेत. लोकांचे धंदे अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या.असे असताना कोणाच्याही घरातील…

Read More

*मालवण तालुका सरपंच आरक्षण सोडत २८ रोजी

तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली माहिती *💫मालवण, दि.२३-:* ग्रामपंचायतीच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीत होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता शासनाच्या ग्रामविकास विभागाने सरपंच आरक्षण निश्चित केले आहे. यात तालुक्यासाठी निश्चित केलेली सरपंचांची आरक्षित पदे ग्रामपंचायतींना विहित पद्धतीने निश्चित करण्यासाठी प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण सोडत २८ जानेवारीला सकाळी ११ वाजता पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात काढण्यात…

Read More

सर्व्हिस रोडलगत आर ओ डब्लू लाईन निश्चित करून गटारे बांधावीत

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हायवे ठेकेदाराला सूचना;चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले गटार बांधकामही पाडले बंद *💫कणकवली दि.२३-:* शहरातील पटवर्धन चौकात लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स समोर सर्व्हिस रोड लगत आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित करून नंतर गटारे बांधावीत अशा सूचना देत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुरू असलेले गटाराचे काम बंद पाडले. येत्या सोमवारी नगराध्यक्ष दालनात हायवे ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांसोबत याबाबत…

Read More

कणकवलीतिल शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सेवाविषयक प्रलंबित ठेवल्याचा आरोप;न्याय न मिळाल्यास प्रजासत्ताकदिनी आत्मदहन करण्याचा इशारा *💫सिंधूदुर्गनगरी दि.२३-:* बोर्डवे आश्रम शाळेचे संस्थाध्यक्ष यानी सेवाविषयक 18 वर्षे प्रलंबित ठेवले आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदासाठी आपण पात्र असताना प्रभारी चार्ज दुसऱ्याकडे देवून आपल्यावर अन्याय करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कणकवली पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत शनिवार पासून जिल्हाधिकारी कार्यालया…

Read More

इन्सुली-गावठणवाडीतील दोघा तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

*💫बांदा दि.२३-:* शेळ्या चरावयास घेऊन जात असताना वाटेत अडवून दोघा बहिणींशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी इन्सुलीतील दोन तरुणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन दीपक नाईक (२०) व अनिल विष्णू राऊळ (३७, दोघेही रा. इन्सुली गावठणवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांही संशयितांना बांदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत बांदा पोलीसांकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी…

Read More

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची २४ रोजी बैठक…

*💫वैभववाडी दि२३-:* आंबेडकरी विचारांचा प्रचार व प्रसार करून मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील कवी, गायक यांची महत्त्वाची बैठक रविवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वा.खारेपाटण येथे आयोजित करण्यात आली आहे. डाॕ.बाबासाहेबांचे विचार जनमानसात पोहचवून मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम आंबेडकरी चळवळीतील कवी, गायकांनी केले आहे.अलिकडच्या काळात ही प्रबोधनाची चळवळ लोप पावत चालली आहे.या ही…

Read More

बांधकाम कामगारांना मिळणार गृहपयोगी भांड्यांचा संच

कामगार नेते हरी चव्हाण यांची माहिती *💫मालवण दि.२३-:* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंर्तगत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय आहे, अश्या महाराष्ट्रातील १० लाख बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूचा ३० भांड्याचा संच देण्यात येणार असून जिल्ह्यातील २५ हजार कामगारांना लाभ मिळणार असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री श्री हरी चव्हाण यांनी…

Read More

तिराली प्रकल्पाचे पाणी सोनुर्ली, वेत्ये, माजगाव, चराठे, मळगाव गावांना देण्यात यावे

*पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण बाबू सावंत यांची मागणी *💫सावंतवाडी दि.२३-:* तिराली प्रकल्पाचे जलवाहिनीद्वारे वेंगुर्ला येथे नेण्यात येणारे पाणी सोनुर्ली, वेत्ये, माजगाव, चराठे व मळगाव गावासाठी देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थातुन होत असुन याबाबत आपण शासनाच्या जीवन प्राधिकरण विभागाचे लक्ष वेधणार आहे, असे पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण उर्फ बाबु सावंत यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून…

Read More

आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलमध्ये चोरी…

*💫बांदा दि.२३-:* आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मधील संगणक कक्षेच्या खिडकीतून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत कक्षातील संगणकाच्या दहा ब्याटऱ्या लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या चोरीमध्ये हायस्कूलचे सुमारे 60 हजारांचे नुकसान झाले असून सातार्डा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचे नववी व दहावी वर्ग सुरू आहेत. पंचनामा…

Read More

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

*💫कणकवली दि.२२-:* स्वतःचे पहिले लग्न झालेले असल्याचे लपवून ठेवत रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून पीडित युवतीवर बलात्कार करणाऱ्या नराधाम रतनू उर्फ रतन विष्णू कांबळे ( रा.रवळनाथ मंदिरनजीक, नागवे रोड कणकवली ) याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवत रतनू कांबळे याने पीडित युवतीशी जवळीक साधली होती. स्वतःचे लग्न झालेले असतानाही…

Read More
You cannot copy content of this page