बांधकाम कामगारांना मिळणार गृहपयोगी भांड्यांचा संच

कामगार नेते हरी चव्हाण यांची माहिती

*💫मालवण दि.२३-:* महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंर्तगत ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय आहे, अश्या महाराष्ट्रातील १० लाख बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूचा ३० भांड्याचा संच देण्यात येणार असून जिल्ह्यातील २५ हजार कामगारांना लाभ मिळणार असल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ, महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री श्री हरी चव्हाण यांनी दिली. इमारत व इतर बाांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बाांधकाम कामगारांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी राज्यातील मंडळाच्या १० लक्ष नोंदीत सक्रिय (जिवंत) बांधकाम कामगाराांना गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने गृहपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी दिली आहे असे हरी चव्हाण यांनी सांगितले. या शासननिर्णयानुसार महाराष्ट्रातील १० लाख कामगारांना मिळणार फायदा मिळणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ हजार कामगारांचा समावेश आहे. याचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रिय जिवित असणे आवश्यक आहे. यामध्ये गृहउपयोगी ५ लिटरच्या प्रेशर कुकर सह कढई, वाट्या, स्टीलची टाकी, डबे, चमचे आदी विविध ३० भांड्यांचा संच लाभार्थी कामगारांना मिळणार असल्याचेही हरी चव्हाण यांनी सांगितले.

You cannot copy content of this page