पालकमंत्र्यांसह, खासदार, आमदार जिल्ह्यात निधी आणण्यास अपयशी ठरल्याने ग्रामपंचायतीत भाजपचे वर्चस्व

*माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांची सत्ताधाऱ्यांवर टीका* *💫मालवण, दि.२९-:* काही वर्षांपूर्वी विकासात आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मागे नेण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले आहे. नारायण राणे सत्तेत असताना जिल्ह्याचा निधी कमी करण्याची धमक कोणत्याही अधिकाऱ्यांमध्ये नव्हती. मात्र राणे सत्तेतून गेल्यानंतर अधिकाऱ्यांवरील धाक संपला. पालकमंत्र्यांसह सत्ताधारी आमदार, खासदार निधी आणण्यात निष्क्रिय ठरले आहेत….

Read More

बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उदघाटन…

*💫कुडाळ दि.२८-:* कुडाळ तालुक्यातील बाव गाळववाडी येथील स्ट्रीट लाईटचे उदघाटन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत तर शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या मागणीवरून आ. वैभव नाईक यांनी हि स्ट्रीट लाईट मंजूर केली आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून ३ लाखाचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला. स्ट्रीट लाईट…

Read More

एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दलबाबत मार्गदर्शन….

*💫मालवण दि.२९-:* सागरी सुरक्षा मोहिमेच्या निमित्ताने स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, एनसीसी विभाग तसेच फिफ्टी महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग व सागरी सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमानाने एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सागरी सुरक्षा दल बाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिकेही करून दाखवण्यात आली. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सागरी सुरक्षा मोहीम नुकतीच पार पडली. २६/११ सारख्या सागरी मार्गाने भारतावर झालेल्या…

Read More

आरओडब्ल्यू लाईन निश्चित न होताच गटार खुदाई करणारा हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन तोंडघशी

खोदलेले गटार बुजविण्याची ओढवली नामुष्की *💫कणकवली दि.२९- :* आरओडब्ल्यू लाईन निश्चित न होताच गटार खुदाई करणारा हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉन तोंडघशी पडला आहे. खोदलेले गटार बुजविण्याची नामुष्की दिलीप बिल्डकॉनवर ओढवली आहे. कणकवली शहरात सर्व्हिस रोडसह ४५ मीटर हायवे आहे. मात्र पटवर्धन चौकात लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स समोर आर ओ डब्ल्यू लाईन निश्चित न करताच गटार खुदाई चे…

Read More

जिल्ह्याच्या विकासासाठी प्राधान्याने निधी द्या…

संदेश पारकर यांनी घेतली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती *💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीना प्राधान्याने विकासनिधी मिळावा तसेच कणकवली नगरपंचायतीला कायमस्वरुपी सिईओ मिळावा यासाठी शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी माजी राज्यमंत्री आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट…

Read More

कणकवलीत भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिम

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून मोहीम : ५६७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया *💫कणकवली दि.२९-:* नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवली नगरपंचायत च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रॅबीज लसीकरण मोहिमेत आजअखेर ५६७ भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. कोल्हापूर येथील संस्थेला हे काम देण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रात भटके कुत्रे…

Read More

ग्रंथ व्यवहारातूनच भाषा जीवंत राहून समृद्ध बनते : वीरधवल परब

वेंगुर्ला येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन *💫वेंगुर्ला दि.२९-:* भाषेतील ग्रंथ व्यवहारातूनच कोणतीही भाषा जीवंत रहाते आणि समृद्ध होते. त्यातील माहितीचे संप्रेक्षण व्हावे या हेतूने लेखन करणारे त्या विषयातील अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी यांचेकडून ग्रंथनिर्मिती केली जाते. नगरवाचनालय वेंगुर्ला ही संस्था वाचनाभिमूख वातावरणातून कार्य करीत आहे. साहित्यिक, व्यासंगी वाचक पुरस्कार, विविध स्पर्धांचे आयोजन करुन प्रत्यक्ष वाचन चळवळ बळकट…

Read More

चिपी विमानतळावर होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे

आशिष हडकर यांची आय. आर. बी. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागणी *💫मालवण दि.२९-:* सिंधुदुर्गच्या विकास प्रक्रियेत महत्वाचे स्थान प्राप्त करणाऱ्या चिपी येथील विमानतळावर होणाऱ्या नोकर भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर यांनी आय. आर. बी. कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयामध्ये मुख्य अधिकारी श्री. देशमुख यांच्यासमवेत…

Read More

आचरा बालगोपाल मंडळाच्या अध्यक्षपदी विलास आचरेकर….

*💫मालवण दि.२९-:* आचरा वरची वाडी येथील बालगोपाल मंडळाची नविन कार्यकारिणी निवड गुरुवारी करण्यात आली.या मंडळाच्या अध्यक्ष पदी विलास दत्ताराम आचरेकर तर उपाध्यक्ष पदी किशोर तुळशीदास आचरेकर यांची निवड सर्वानूमते करण्यात आली. या मंडळाच्या सचिव पदी गोविंद शिवराम शेट्ये,सहसचिव महेंद्र हरिशचंद्र आचरेकर आचरेकर,खजिनदार पंकज वामन आचरेकर यांची निवड करण्यात आली.या साठी निवडणूक अधिकारी म्हणून वैभव शाली…

Read More

कांदळगाव ग्रामपंचायतीतर्फे उद्योजक डॉ. दिपक मुळीक परब यांचा सत्कार…

*💫मालवण दि.२९-:* कोरोना काळात ग्रामपंचायतीस मदत केल्याबद्दल उद्योजक डॉ. दिपक मुळीक परब यांचा सरपंच सौ. उमदी उदय परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना परब म्हणाल्या, कोरोना काळातच नव्हे तर इतरही प्रसंगी डॉ. परब हे सढळ हस्ते मदत करत असतात विविध संस्थेवर ते असून त्या संस्था चांगल्या पद्धतीने नावारूपास आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे….

Read More
You cannot copy content of this page