अनाधिकृत मायनिंग प्रश्नी राज्यपालांकडे तक्रार करणार- राजन तेली…

_अनाधिकृत सिलिका मायनिंग व अवैद्य वाळू व्यवसायिकांच्या पाठीशी कोण?; प्रशासकीय अधिकारी व सत्ताधाऱ्यांचे साटेलोटे. *💫कणकवली दि.२५-:* अवैध मायनिंग यापूर्वी सुद्धा आम्ही आवाज उठवला आहे.खरतर कुंपणच शेत खात आहे.अधिकारी,कर्मचारी व पोलीस आणि मायनिंग अधिकारी एकत्र अनाधिकृत काम करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.यापूर्वी जिल्हाधिकारी यांना भेटून माहिती दिली तरी कारवाई झाली नाही. कासार्डे येथे फक्त तीन लोक लीज…

Read More

मेढे येथील महाशिवरात्री साठी यावर्षी भाविकांना बंदी….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय *💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील शिवभक्तांचे प्रसिद्ध श्रद्धास्थान असलेल्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या तेरवण मेढे येथील पवित्र तीर्थक्षेत्र समजल्या जाणाऱ्या श्री नागनाथ मंदिरात १० व ११ मार्च या दिवशी होणाऱ्या शिवयात्रेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनास येण्यास बंदी करण्यात आली असून तसे आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे देवस्थान समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले…

Read More

सावंतवाडीत ४५ वर्षांवरील हौशी लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

*💫सावंतवाडी दि.२५* येथे आयोजित करण्यात आलेली ४५ वर्षांवरील लेदर बॉल हौशी क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या स्पर्धेत कुडाळ संघाने वेंगुर्ला व सावंतवाडी ब संघावर मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु संध्याकाळी पावसाचा व्यत्यय आल्याने उर्वरित सामने होऊ शकले…

Read More

कणकवली पं स च्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर…

*💫कणकवली दि.२६-:* पं स च्या रिक्त असलेल्या उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावावर खासदार नारायण राणे यांनी शिक्कामोर्तब केले असून पारकर यांनी उपसभापती पदासाठी आपले नामनिर्देशन दाखल केले आहे. उपसभापतीपदी प्रकाश पारकर यांच्या नावाचा लिफाफा खासदार नारायण राणे यांनी भाजपा ग्रामीण तालुकाध्यक्ष संतोष कानडे, शहर तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानुसार पारकर यांनी आपले नामनिर्देशन…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी केला भाजपात प्रवेश….

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत;कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला धक्का *💫कणकवली दि.२५-:* राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी कार्यकत्यांनी भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे,आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. हा प्रवेश कणकवलीत ओमगणेश निवास्थानीं करण्यात आला.या प्रवेशने कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीला फार मोठा…

Read More

कणकवली नगरपंचायतच्यावतीने शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनची वाटप…

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते वाटप;शिक्षकांनी व्यक्त केले आभार… *💫कणकवली दि.२५-:* कणकवली नगरपंचायत मार्फत शहरातील प्राथमिक,माध्यमिक व इंग्लिश मिडीयम या शाळांना अँटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे वाटप नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर,नगरसेवक विराज भोसले,अजय गांगण, महेश सावंत,अभिजित मुसळे,किशोर राणे व शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. शाळेचे नाव जि.प….

Read More

कासार्डे, वैभववाडी तालुक्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून अवैध सिलिका वाळू उत्खनन…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप : प्रधान सचिव, वनविभाग आणि हरित लवादाकडे करणार तक्रार *💫कणकवली दि.२५-:* कासार्डे आणि वैभववाडी तालुक्यातील गावांत सत्ताधारी आणि विरोधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अवैध सिलिका वाळू उत्खनन करत आहेत. हे उत्खनन इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात सुरू असून याविरोधात आम्ही प्रधान सचिव, वनविभाग आणि हरित लवादाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस…

Read More

अन्याय निवारण फोर्स, सिंधुदुर्ग संघटनेची स्थापना…

*संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर *💫सावंतवाडी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन अन्याय निवारण फोर्स, सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी साईप्रसाद कल्याणकर (बांदा) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. ही संघटना विविध कार्यालयातील भष्टाचार व अन्यायाला वाचा…

Read More

*स्वराज्य संघटनेने आयोजित केलेल्या किल्ला बनवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

*💫सावंतवाडी दि.२५-:* स्वराज्य संघटनेने यावर्षी आयोजित केलेल्या किल्ला बनवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल संपन्न झाला आहे. या स्पर्धेला स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. सिंधुदुर्ग महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना व नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी…

Read More

मालवण बाजारपेठेतील किराणा दुकानात चोरी

रोख रक्कम केली लंपास : गुरुवारी पहाटेची घटना *💫मालवण दि.२५-:* मालवण बाजारपेठेतील नाना पारकर यांच्या पारकर किराणा मर्चंट या दुकानाच्या छप्पराची कौले काढून अज्ञात चोरट्यांने दुकानात प्रवेश करीत दुकानातील ड्रॉव्हर फोडून ७ ते ८ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची माहिती दुकानाचे मालक ज्येष्ठ व्यापारी नाना पारकर यांनी दिली आहे. बाजारपेठेत चोरी झाल्याने व्यापारी आणि…

Read More
You cannot copy content of this page