समाज माध्यामांवर फिरणारी ती बातमी चुकीची…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि..०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने 8 तालुक्यातील 306 गावे बाधित झाल्याबाबतचे एक वृत्त समाज माध्यमांवर फिरत आहे. सदरचे वृत्त जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या नावे आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आशा प्रकारचे कोणतेही वृत्त प्रसारीत केले नसून सदरची बातमी चुकीची असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. या वृत्तामध्ये दिलेली आकडेवारी ही जुनी असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले…

Read More

आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड…

*💫कणकवली दि.०४-:* महाराष्ट्र राज्य महिला पतंजली समितीच्या वतीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली वरवडेच्या ज्ञानद्या शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या आर्या फाटक हिचा 8 ते 12 वयोगटात पहिला व हर्षिता सावंत हिचा 13 ते 20 वयोगटात दुसरा जिल्हास्तरावर नंबर आला आहे. तसेच त्यांची राज्यस्तरीय योगासन स्पर्धासाठी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी 20 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि ०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 131 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 20 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. ३ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

दांडेली रस्त्यावर माती ओतल्याने धोका…

प्रशासनाचे दुर्लक्ष;अपघात घडण्याची शक्यता *💫बांदा दि.०४-:* दांडेलीहून बांद्याच्या दिशेने जाताना उतरणीवर अज्ञात वाहनाने सुमारे दहा मीटर अंतरावर माती ओतण्याची घटना घडली. सदर घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील माती बाजूस करण्याची मागणी वाहनचालक तसेच नागरिकांमधून होत आहे. बांदा-शिरोडा…

Read More

शासनाच्या अपुऱ्या कामामुळेच कार्डधारक धान्यापासून वंचित

मालवण तालुका धान्य व केरोसीन संघटना अध्यक्ष सुनील मलये यांचे स्पष्टीकरण* *💫मालवण दि.०४-:* एकीकडे अन्नसुरक्षा कायदा सांगतो की एकही कार्डधारक धान्यापासून वंचीत राहता कामा नये आणि दुसरीकडे शासनाच्या अपुऱ्या कामामुळे कार्डधारक धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाने फेब्रुवारी २०२१ या महिन्यापासून रेशन दुकानदारांना ऑफलाइन धान्य वाटप न करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. मालवणच्या धान्य दुकानदारांनी ऑफलाईन…

Read More

*पहिली केंद्रीय उड्डाण समितीची परवानगी घ्या नंतरच तारीख जाहीर करा

*मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा खोचक टोला* *💫कणकवली दि.०४-:* चिपी एअरपोर्टच्या अनेकदा उद्घाटन तारखा जाहीर झाल्या आहेत.तर सध्याच्या भाजपा खासदारांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री,पालकमंत्री असताना अनेकदा दगड लावत आपली नावे कोरली. शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी गणेश चतुर्थी दरम्यान गणपती आणत विमान उतरवलं.शिवसेना खासदारांनी पुन्हा एकदा १ मार्चला उद्घाटन करण्याचे जाहीर केले.पण अद्याप उद्घाटन झाले नाही,ही जनतेची चेष्टा चालवली आहे.पहिल्यादा…

Read More

कुणकेश्वर व भराडी देवीची यात्रा साध्या पद्धतीने साजरी करा

जिल्हाधिकारी : केवळ देवस्थान कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार ओरोस प्रतिनिधी दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेली कुणकेश्वर यात्रा व नवसाला पावणारी भराडी देवीची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. याठिकाणी केवळ देवस्थान कमिटीच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे या यात्रा स्थळी नागरिकांनी गर्दी करून नये. आपली…

Read More

ऑनलाइन-ऑफलाइन धान्य देण्यावरून नागरिक हैराण

मनसे पदाधिकार्‍यांनी वेधले मालवण तहसीलदारांचे लक्ष *💫मालवण दि.०४-:* शासन मान्य रास्तधान्य दुकानात ऑनलाइन व ऑफलाइन धान्य देण्यावरून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्‍यांनी आज मालवण तहसिलदार अजय पाटणे यांची भेट घेत निवेदन दिले . यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर अध्यक्षा भारती वाघ तालुका उपाध्यक्ष उदय गावडे,…

Read More

भाजप सावंतवाडी शहर अध्यक्षांच्या कारची चावी गहाळ

चावी परत देणाऱ्यास आकर्षक बक्षीस : अजय गोंदावळे यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि०४-:* भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हुंडाई आय २० या चारचाकी गाडीची चावी २ मार्च रोजी तहसीलदार कार्यालय येथून सावंतवाडी एस्टी स्टॅन्ड परिसरात गहाळ झाली आहे. या चावी सोबत अजुन दोन चाव्या असून, चावी आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे…

Read More

राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतियोगितेत मोठ्या गटात भडगाव हायस्कूलचा निहार मुंज उत्तेजनार्थ

ऑनलाईन पद्धतीने केले पारितोषिक वितरण *💫कुडाळ दि.०४-:* गांधी रिसर्च फाऊंडेशन ,जळगाव , मराठी विज्ञान परिषद, आणि नॅशनल इनोवेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतियोगितेत मोठ्या गटात कुडाळ तालुक्यातील भडगाव हायस्कूल मध्ये इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेणाऱ्या कु. निहार अमोल मुंज या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले आहे. यावेळी त्याला ५ हजार चे…

Read More
You cannot copy content of this page