समाज माध्यामांवर फिरणारी ती बातमी चुकीची…

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

*💫सिंधुदुर्गनगरी दि..०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने 8 तालुक्यातील 306 गावे बाधित झाल्याबाबतचे एक वृत्त समाज माध्यमांवर फिरत आहे. सदरचे वृत्त जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या नावे आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आशा प्रकारचे कोणतेही वृत्त प्रसारीत केले नसून सदरची बातमी चुकीची असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. या वृत्तामध्ये दिलेली आकडेवारी ही जुनी असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. समाज माध्यमे जसे व्हॉट्सॲप, फेसबूकच्या माध्यमातून येणाऱ्या चुकीच्या वृत्तांवर लोकांनी विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या आफवा पसरवू नयेत असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page