बेकायदेशीर गुटखा वाहतुकीवर बांदा पोलिसांची धडक कारवाई

*९ लाख ९८ हजाराचा गुटखा जप्त*

*💫बांदा दि.०२-:* गोव्याहून मुंबईच्या दिशेने बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर कॅन्टरवर बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत बांदा पोलिसांच्या हाती ९ लाख ९८ हजार रुपयांचे विमल गुटख्याचे पाकीट हाती लागले आहेत. ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक उदय कामत, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय गोळे, संजय हुंबे यांनी केली या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. गाडीत मेडिसीन आहे असे सांगून चालक वाहतूक करत होता. मात्र, पोलिसांच्या समयसूचकतेमुळे कारवाई झाली.

You cannot copy content of this page