मनसे पदाधिकार्यांनी वेधले मालवण तहसीलदारांचे लक्ष
*💫मालवण दि.०४-:* शासन मान्य रास्तधान्य दुकानात ऑनलाइन व ऑफलाइन धान्य देण्यावरून नागरिकांना भेडसावणार्या समस्यांबाबत मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकार्यांनी आज मालवण तहसिलदार अजय पाटणे यांची भेट घेत निवेदन दिले . यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर अध्यक्षा भारती वाघ तालुका उपाध्यक्ष उदय गावडे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष हितेंद्र काळसेकर,राधिका गावडे,विजय पेडणेकर,नंदकिशोर गावडे आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, शासन मान्य रास्तधान्य दुकानातुन देण्यात येणारे धान्य या महिन्यापासुन ऑफलाइन पद्धतीने न देता ऑनलाइन स्वरूपातच देण्याच्या सुचना येथील पुरवठा विभागाने रास्त धान्य दुकानधारकांना दिले आहे. कोरोनाच्या काळात शासकीय रास्त धान्य दुकानातून ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन धान्य देण्याच्या सुचना शासनाने दिल्या होत्या मात्र या महिन्यापासून पुन्हा एकदा ऑनलाइन स्वरूपात धान्य देण्यात यावे अशा सुचना येथील पुरवठा विभागाने व्हाट्सअपच्या एका मेसेज वरुन रास्त दुकानधारकांना दिल्या आहेत. रास्त धान्यदुकानदार आणि ग्राहकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. कोरोना संकट अजुन टळलेलं नाही शासनाकडून अजूनही लॉकडाऊनचा पर्याय जनतेला सांगितला जात असताना हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचं धान्य मिळण्यास अडचण निर्माण होणार आहे. तर काहीजण वंचित राहणार आहेत. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा असुन काही प्रश्न उपस्थित होत आहेत. आपल्या कार्यालयात यासंबंधी कोणतीही लेखी स्वरूपाची सुचना शासनाकडून आली नसताना पुरवठा विभागातील कर्मचारी व्हाट्सअप वरून ऑनलाइन पद्धतीने धान्य वितरित करण्याच्या सुचना काही निवडक रास्तधान्य दुकानदारांना देण्याची घाई का? सदरील व्हाट्सअप वरील सुचना सर्वांना न देता काही निवडक रास्तधान्य दुकानदारांनाच का दिली गेली? ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरित करण्यासंदर्भात जनजागृती का नाही? वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्धी का दिली गेली नाही? धान्यकोठारामध्ये आलेले धान्य पडून आहे. धान्यापासुन वंचित राहणाऱ्या शिधाधारकांना हे धान्य वितरीत केव्हा होणार? या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या आपल्या कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांची माहिती वेळीच का पाठवली नाही.? सदर मेसेज व्हाट्सअपवर पाठण्याअगोदर सर्व शिधाधारकांची बैठक घेवून सुचना का करण्यात आल्या नाहीत.? तरी हा सर्व प्रकार संशयास्पद असुन उपलब्ध धान्य काळ्याबाजारात विक्री होण्याची शक्यता असुन आपण स्वतः जातीनिशी लक्ष घालून चौकशी करावी तसेच मागील महिन्यात ऑनलाइन पद्धतीने धान्य देण्यात आल्याने अनेक गरीब लोक धान्यापासून वंचित राहिले आहेत. अशा लोकांना या महिन्यात मागील महिन्यातील धान्य ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावे. अशी मागणी आम्ही मालवण तालुका मनसेच्यावतीने या पत्राद्वारे करत आहोत.
