माजगाव चिपटेवाडी धरण दुष्टिक्षेपात अधिकारी-प्रकल्पग्रस्त बैठकीत एकमत…

मोबदला सहा महिन्यात मिळण्याची प्रमुख अट;जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेणार:श्रीकृष्ण उर्फ बाबू सावंत *💫सावंतवाडी दि.२९-:* माजगाव चिपटेवाडी येथे होऊ घातलेल्या व गेले कित्येक वर्ष रखडलेल्या धरण प्रकल्पाच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असुन प्रकल्प अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक नुकतीच माजगाव महादेव मंदिरात पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांकडून प्रकल्पाला होकार देण्यात आला मात्र जमीन तसेच स्थावर मालमत्तेसह मोबदला…

Read More

कर्ली घोणसरी धरणाच्या धबधब्यात बुड़ुन एकाचा मृत्यु…

दोघांना वाचविण्यात यश सुधीर कदम मृत तरुणाचे नाव वैभववाडी :कुर्ली – घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले मात्र दुर्दैवाने कोकिसरे येथील विवाहित तरुण गॅरेज मालकाचा घोणसरी येथील कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मयत तरुण सुधीर गोविंद कदम वय 30 सध्या राहणार कोकिसरे, नारकरवाडी, मूळ रा.पाडळी खुर्द,ता.करवीर,जि.कोल्हापूर असे नाव आहे.ही घटना सोमवार 30 मार्च रोजी…

Read More

शिरशिंगे गोटवेवाडीत हायमास्ट टॉवर सुरु…

सावंतवाडी सेना तालूका प्रमुख रूपेश राऊळ यांच्याहस्ते शुभारंभ *💫सावंतवाडी दि.२९-:* शिरशिंगे गावातील गोटवेवाडी येथील हायमास्ट चे उद्घाटन शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, उपतालुकाप्रमुख बाळू माळकर, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, जीवन लाड, शाखाप्रमुख संतोष चव्हाण, वसंत शिर्के, बाळकृष्ण घावरे,…

Read More

मडुऱ्याच्या नितेश परीटला अखिल भारतीय कला प्रदर्शनात सुवर्णपदक…

*💫बांदा दि.२९-:* मुंबई येथील आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक कला प्रदर्शनात सावंतवाडी तालुक्यातील मडूरे गावातील नवोदित शिल्पकार नितेश प्रफुल्ल परीट याच्या ‘धाकल्या बहिणाबाई’ या व्यक्तिशिल्पाला सुवर्ण पदकाचा मान मिळाला. नितेशने मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून शिल्पकलेचे शिक्षण प्रथम श्रेणीत विशेष प्रविण्यासह पूर्ण केले असून त्यातही तो महाराष्ट्रातून प्रथम आला होता. नितेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्व…

Read More

उपरकर यानी हवेत बार मारून थांबू नये…

पुरावे सादर करावे:अधिकारी व मायनिंग माफिया यांच्यावर कारवाईसाठी राष्ट्रवादी साथ देईल; जिल्हा उपाध्यक्ष पिळणकर यांची माहिती कणकवली – केवळ हवेत बार मारून उपरकर यांनी थांबू नये तर, त्यांनी कोणत्या मायनिंग व्यावसायिकाने कोणत्या अधिकाऱ्याला बायका पुरविल्या त्यांची नावे जाहीर करावीत. राष्ट्रवादी उपरकर यांच्या पाठीशी राहून हे अधिकारी आणि मायनिंग माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चितच प्रमुख भूमिका…

Read More

मळगांव बाजारपेठ दुसऱ्या दिवशी बंद…

कोरोना रुग्ण मिळाल्याने निर्णय:नागरिकांचा चांगला प्रतिसाद *💫सावंतवाडी दि.२९-:* मळगाव येथे कोविड रुग्ण सापडल्याने सावधगिरी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांअभावी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पसरला होता. कोविड-१९ ची दुसरी लाट पसरत आहे. मळगाव येथे कोरोनाचे रुग्ण सापडल्याने डॉक्टर, मेडिकल आदी अत्यावश्यक सेवा वगळता रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात…

Read More

जलतरण स्पर्धेत पूर्वा गावडेला सिल्व्हर मेडल…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* डेरवण येथे झालेल्या युथ गेम मध्ये राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने दुसरा क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकावले तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्ट क्रीडा प्रबोधिनीच्या वतीने विविध क्रीडा प्रकारातील राज्यस्तरीय युथ गेमचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये जलतरण…

Read More

सावंतवाडी तालुक्यात सापडला आणखी एक कोरोना रुग्ण…

*💫सावंतवाडी दि.२९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १ रुग्ण सापडला असून, हा रुग्ण ग्रामीण भागात सापडला आहे. तर आज शहरात एकही रुग्ण सापडला नाही. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. निरवडे या गावांमध्ये हा रुग्ण सापडला आहे. सद्यस्थितीत सावंतवाडी तालुक्यात ४७ रुग्ण सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Read More

रेवंडी – तळाशील खाडीपात्रातील अतिक्रमणाकडे डोळेझाक

५ एप्रिल पासून खाडीपात्रातच उपोषण करण्याचा सरपंचाचा इशारा मालवण : (प्रतिनिधी) रेवंडी- तळाशील खाडीपात्रात काही व्यक्तींनी खालची रेवंडी किनाऱ्यालगत असलेले कांदळवन व पतन विभागाच्या बंधाऱ्यांची तोड करून अनधिकृत पणे खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. या अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने डोळेझाक केल्याने खाडीपात्रात जोरदार अतिक्रमण सुरू सुरू असून खाडी…

Read More

परब मराठा मुंबई अध्यक्षपदी मंत्री अनिल परब…

उपाध्यक्षपदी दीपक परब निवडी बिनविरोध *💫मालवण दि.२९-:* मुंबई येथील परब मराठा समाज, मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचे परिवहन व सांस्कृतिक कार्यमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ऍड.अनिल परब यांची तर उपाध्यक्षपदी मसुरे चांदेर गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक डॉ श्रीकृष्ण (दीपक) परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दादर- मुंबई येथे परब मराठा समाजची वार्षिक सर्वसाधारण…

Read More
You cannot copy content of this page