आमदार वैभव नाईक यांनी आणलेला कोट्यावधीचा निधी फक्त कागदावरच

*नगराध्यक्ष ओंकार तेली यांचा आमदार वैभव नाईक यांना टोला *💫कुडाळ : दि.०४-:* आमदार वैभव नाईक हे केवळ कोट्यावधीचा निधी आणतात, पण त्यांनी आणलेला तो निधी नेहमीच कागदावर असतो, असा जोरदार टोला नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे. कोविड काळात कोणतेही राजकारण न करता नगरपंचायतीने कुडाळ शहर कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले….

Read More

बावशी शाखाप्रमुख पदी महेंद्र मर्ये तर युवा सेना शाखाप्रमुख सुरज नार्वेकर यांची निवड….

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली तालाक्यातील बावशी गावातील शिवसेनेच्या शाखप्रमुख पदी महेंद्र मर्ये यांची निवड झाली असून युवा सेनेच्या शाखप्रमुख पदी सुरज नार्वेकर यांची निवड झाली  आहे .नुकतीच शिवसेनेच्या कणकवली येथे मेंळावा संपन्न झाला यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत .तसेच तोंडवली –बावशी या ग्रुप ग्रा.पं.ची मुदत संपून प्रशासक नेमणूक झाली असून केव्हाही निवडणूक जाहीर होवू शकते…

Read More

महिला पतंजली योगसमिती कोकण प्रांताच्यावतीने महिलांसाठी ऑनलाईन योगशिबिर….

*💫कणकवली दि.०४-:* स्वामी रामदेव प्रणित पतंजली महिला समितीच्या कोकण प्रांत यांच्यावतीने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तीन जिल्ह्यांसाठी ऑनलाइन सहयोग शिक्षक प्रशिक्षण (वर्ग-२) दि.२१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०२० या कालावधीत सुरू आहे. सदर शिबिरामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, पुणे, गोवा या भागातून एकूण ८३ प्रशिक्षणार्थी योगाचे उत्तम प्रशिक्षण घेत आहे. या शिबिराचा मुख्य हेतू…

Read More

पत्रकार नितीन गावडे यांना पितृशोक

*💫मालवण दि०४-:* मालवण तालुक्यातील चौके येथील रहिवासी गणपत काशिराम गावडे ( वय- ८२) यांचे आज शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. चौके येथील पत्रकार नितीन गावडे यांचे ते वडील होत. गणपत गावडे हे पूर्वीच्या काळी बैलगाडी व्यावसायिक होते. या बरोबरच त्यांनी शेती, चिरेखाण व्यवसाय करून परिसरात नावलौकिक मिळवला होता. चौके…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयात १२ डिसेंबर रोजी लोक अदालतचे आयोजन

*वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी लोक अदालत मध्ये सहभागी होण्याचे जिल्हा विधी प्राधिकरण अध्यक्ष हांडे आणि सचिव दीपक म्हालटकर यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सुचनेनुसार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून, लोक अदालत सिंधुदुर्ग ओरोस आणि तालुका न्यायालयात सकाळी…

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर….

*💫वेंगुर्ला दि.०३-:* सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे येथील ग्रामीण रुणालयात तालुक्यातील पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. आज सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात तालुक्यातील पत्रकारांची रक्तदाब, मधूमेह वगैरे मोफत तपासणी ग्रामीण रुणालयाचे वैद्यकीय अधिकारी पंडीत डवले, डॉ. प्रल्हाद मणचेकर आणि…

Read More

मळगाव बाजारपेठेत शुकशुकाट

*बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी : अत्यावश्यक सेवा सुरू *💫सावंतवाडी दि.०३-:* सहदेव राऊळ : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे बाजारपेठ सॅनिटाईझ करण्याच्या पार्श्वभूमीवर आज मळगाव बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. यावेळी बाजारपेठेत ग्रामपंचायतीतर्फे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद असल्यामुळे बाजारपेठेत पूर्णतः शुकशुकाट जाणवत होता. मळगाव परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने मळगाव ग्रामपंचायतीच्यावतीने मळगाव…

Read More

बेधुंद पर्यटकांची ‘वरात’ पोलीस ठाण्यात

तारकर्ली गावातील घटना : दगडफेक व मारहाणीच्या घटनेत ग्रामस्थ जखमी *💫मालवण दि.०३-:* पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात बुधवारी रात्री बेधुंद पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांना मारहाण केल्याची घटना घडली. पर्यटकांच्या कारने दुचाकीस्वरास धडक दिली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना ही मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी पर्यटकांना थेट पोलीस ठाण्यात नेले….

Read More

कणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन…

*💫कणकवली दि.०३-:* कृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज धरणे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस एम. एम. सावंत,…

Read More

भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून…!!

संस्थानची माहीती;शासकीय नियम पाळून साधेपणाने साजरा होणार… *💫कणकवली दि०३-:* शहरातील परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने यंदा हा उत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवात सर्व धार्मिक विधी होणार आहेत. मात्र महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची…

Read More
You cannot copy content of this page