सावंतवाडीत दंगा कानूनची रंगीत तालीम.

*💫सावंतवाडी दि २४-:* सावंतवाडी शहरात कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक, वरिष्ठांच्या आदेशानुसार दंगा कानुन ची रंगीत तालीम शहरात मोक्याच्या ठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम करण्यात आली आहे.

Read More

संजना सावंत यांच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल…

जिल्ह्यातील ५७ ॲम्बुलन्स घेतली भाडयाने;दरही केले निश्चित पालकमंत्री उदय सामंत यानी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बैठकीत कोरोना नियंत्रण उपाययोजना सूचविताना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यानी भाडे तत्वावर ॲम्बुलन्स घेण्याची सूचना केली होती. याची दखल जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी तात्काळ घेत सिंधूदुर्ग उपप्रादेशील परिवहन कार्यालयात यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स कंट्रोल रूम सुरु केला आहे. तसेच ५७…

Read More

एक्साईजचा अन्य एका दुकानावर छापा…

हाती काही नाही:कारवाईने सावंतवाडीतील बेक़ायदेशीर मद्य विक्री व्यावसायिक अडचणीत *💫सावंतवाडी दि.२४-:* शहरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात आज सकाळीच बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या युवकाला एक्साईज पथकाने दारू विक्री करताना रंगेहाथ ताब्यात घेतले असून, एका दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा देखील टाकला आहे. परंतु त्या दुकानात काहीच न सापडल्याने त्यांना…

Read More

सावंतवाडी न प मध्ये आणखी एक कर्मचारी कोरोना बाधित…

*💫सावंतवाडी दि.२४-:* नगरपालिकेतील आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काल रात्री उशिरा हा अहवाल प्राप्त झाला आहे. यापूर्वी एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली असता, आणखी एक कर्मचारी कोरोना बाधित आढळून आला आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Read More

सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात गोवा बनावटीची दारू विक्री..

एक युवक ताब्यात:एक्साईजची कार्रवाई *💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी मच्छी मार्केट परिसरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या प्रवीण देऊलकर (वय ३०) या युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आज साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. ओरोस येथील एक्साईज चा पथकाने ही कारवाई केली आहे.

Read More

कुडाळ महिला रुग्णालयातील कोविड सेंटरला आरोग्य सभापतींची भेट…

गैरसोई दूर करण्याच्या केल्या सूचना कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयांमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी भेट देऊन या रुग्णालयात असलेल्या गैरसोईंबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी आज (शुक्रवारी) कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला…

Read More

*दिवसरात्र सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांना चहा पाणी देऊन मनसेने मानले आभार

💫 *देवगड* :- गेल्या वर्षभरापासून कोरोना योध्दा म्हणून डाॅक्टराप्रमाणे अहोरात्र सेवा देत असलेल्या देवगड तालुक्यातील पोलिस बांधवाना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व देवगड सहसंपर्क अध्यक्ष श्री संतोष मयेकर यांच्या वतीने आज चहा पाणी देऊन त्याचे आभार मानण्यात आले यावेळी उप तालुका अध्यक्ष महेश नलावडे,बबलु परब,राकेश मिराशी,वैभव आचरेकर, प्रवीण झोरे, निमेश कोकरे आदि कार्येकर्ते उपस्थित होते.

Read More

जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ‘ई पास’…

संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा : अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांचे आवाहन *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* कोरोना काळात आंतरराज्य आणि जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी आता ई पास आवश्यक असून अत्यावश्यक कालावधीसाठी संबंधितांनी पोलीस विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपला परिपूर्ण अर्ज करावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव आजच्या पार्श्वभूमीवर राज्यात…

Read More

शिवभोजन केंद्रावर पार्सल पद्धतीने मिळणार मोफत भोजन एक महीना सवलत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 12 शिवभोजन केंद्रांना मंजरी देणेत आलेली असून त्याचा दैनिक इष्टांक 825 एवढा आहे. वेंगुर्ला तालुका वगळता सद्यास्थीत 11 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. राज्य शासनाने उपहारगृहे, हॉटेल यांना फक्त पार्सल सुविधेचा परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने शिवभोजन केंद्रावर निर्जंतुकीकरण्याच्य नियमांचे पालन करुन एक महिन्यार्पत पार्सल सुविधेव्दारे ग्राहकांना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सद्यास्थीतीत…

Read More

एक महीना मिळणार मोफत धान्य..

५ किलो मिळणार धान्य:गीते यांची माहिती सिंधुदुर्गनगरी-:कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास प्रतिबंध व्हावा याकरिता अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 1 महिन्याकरीता मोफत अन्नधान्य गहू व तांदुळ वाटप करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार 1 महिन्याकरिता अन्नधान्याचे मोफत वाटप करण्यात येणार असून ज्या लाभार्थ्यांने माहे एप्रिल 2021 साठी देय असलेले अन्नधान्य…

Read More
You cannot copy content of this page