गैरसोई दूर करण्याच्या केल्या सूचना
कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयांमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी भेट देऊन या रुग्णालयात असलेल्या गैरसोईंबाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती सौ. अनिषा दळवी यांनी आज (शुक्रवारी) कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयमध्ये सुरू केलेल्या कोव्हिड केअर सेंटरला भेट दिली या भेटीदरम्यान रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी गैरसोईंबाबत कैफियत मांडली यामध्ये दिले जाणारे जेवण, दूध, अंडी, पाणी अशा तक्रारी होत्या. याबाबत सभापती सौ. अनिषा दळवी यांनी तालुका अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांना सूचना केल्या तसेच त्यांनी पणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राला ही भेट दिली त्या ठिकाणच्या सुद्धा लसीकरण आणि कोव्हिडं तपासणी करता येणाऱ्या नागरिकांना अधिक चांगली सुविधा देण्या बाबत सूचना केल्या यावेळी त्यांच्या समवेत भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे भाजपचे तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, नगरसेवक सुनील बांदेकर, किरण मोरे पणदूर आरोग्य केंद्राच्या डॉ. अश्विनी खोत, डॉ. नालंदा काजरेकर उपस्थित होत्या.
