हाती काही नाही:कारवाईने सावंतवाडीतील बेक़ायदेशीर मद्य विक्री व्यावसायिक अडचणीत
*💫सावंतवाडी दि.२४-:* शहरात बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारू विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात आज सकाळीच बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्री करणाऱ्या युवकाला एक्साईज पथकाने दारू विक्री करताना रंगेहाथ ताब्यात घेतले असून, एका दारू विक्री करणाऱ्या दुकानावर छापा देखील टाकला आहे. परंतु त्या दुकानात काहीच न सापडल्याने त्यांना रिकामी हाताने माघारी परतावे लागले आहे. त्यामुळे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
