आपल्या अनुभवाचा ऊपयोग कोकणच्या पर्यटनासाठी करून घ्यावा…

निला लाड यांचे आवाहन *💫मालवण दि.०९-:* कोरोना सारख्या भीषण महामारीने देशभरातील सर्वच घटकांना आर्थिक फटका बसला असून यातून सावरण्यासाठी धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.विशेषतः पर्यटन उद्योगाची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून नोव्हेंबर २०२०ते फेब्रुवारी २०२१ या चार महिन्यांच्या कालावधी या क्षेत्रातील छोटे मोठे व्यवसायिक थोडी फार उभारी घेत असताना मार्चपासून कोरोना महामारीने देशभर हैदोस…

Read More

धावत्या कारला लागली आग

कळसुली हर्डी फाटा येथे घडली घटना *💫कणकवली दि.०९-:* धावत्या कारला आग लागून नुकसान झाल्याची घटना कळसुली हर्डी फाटा येथे घडली.डोंबिवली मुंबई येथे कामानिमित्त राहणारे आणि सध्या लॉकडाऊन मध्ये कळसुली येथील आपल्या गावी आलेले महेश मारुती पवार हे आपल्या ताब्यातील ह्युंडाई कंपनीची वेर्णा कार ( MH- 02 – CH – 7729 ) घेऊन 8 मे रोजी…

Read More

चौके आरोग्य केंद्रावर स्थानिकांना डावलून इतर तालुक्यातील लोकांनाच लसीकरण

जिल्हाधिकारी आणि राज्य आरोग्य संचलकानी करावी चौकशी; सरपंच राजन गावडेची मागणी* *💫मालवण दि.०९-:* राज्यात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली असताना या लसीकरण मोहिमेसाठी शासनाने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली आहे. शासनाने सुरू केलेल्या या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा काही जणांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून फायदा उठवीत दुसऱ्याच तालुक्यातील…

Read More

*वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी मालवण नगरपालिकेला ४४ लाख रुपये निधी मंजूर

*खा. विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे निधी झाला मंजूर; तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची माहिती* *💫मालवण, दि.०९-:* खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेतंर्गत येथील पालिकेच्या सुमारे बारा कामांसाठी ४४ लाख ४२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली. मालवण नगरपालिकेने सुचविलेल्या या बारा कामांमध्ये…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५४ रूग्ण सापडले

शहरात १७ तर ग्रामीणात ३७ *💫सावंतवाडी दि.०९-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५४ रुग्ण सापडले असून, शहरात १७ तर ग्रामीण भागात ३७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात सालईवाडा ५, सावंतवाडी ६, मोरडोंगरी १, बाहेरचावाडा १, सबनीसवाडा ३, भटवाडी १, तर ग्रामीण भागात कलंबिस्त ५, कारिवडे १,…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ५०७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कुडाळ तालुकाध्यक्ष पदी कृष्णा सावंत यांची निवड…

*_▪️उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर तर सचिव पदी मिलिंद धुरी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या उपस्थित निवड संपन्न._.* *💫कुडाळ,ता.०९:-* महाराष्ट्र राज्य मराठी कुडाळ तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जिल्हाध्यक्ष श्री.आबा खवणेकर यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली आहे. यावेळी कुडाळ तालुका अध्यक्षपदी श्री.कृष्णा सावंत यांची, तर उपाध्यक्षपदी आनंद कांडरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी मिलिंद धुरी, खजिनदार…

Read More

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप…

*💫कुडाळ दि.०९-:* आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे आज ६ ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड रुग्ण वाढत असून ऑक्सीजन बेडची आवश्यकता भासत असल्याने जिल्ह्यात ऑक्सीजन बेड वाढवण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ऑक्सीजन प्लांटचे काम…

Read More

*कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांचा स्तुत्य उपक्रम

रुग्णांना पोष्टिक आहार मिळण्यासाठी आजपासून अंडी वाटप; सर्व स्तरातून धुरी यांचे कौतुक* *दोडामार्ग / सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यात कोरोना मोठ्या प्रमाणात थैमान घालत आहे.परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पौष्टिक आहार मिळणे गरजेचे आहे.यासाठीच तालुक्याच्या कोव्हिडं सेंटर मधील रुग्णांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख व प स सदस्य बाबुराव धुरी यांनी रुग्णांना आज पासून अंडी…

Read More

प्राणजीवन सहयोग संस्थेकडून निगुडे गावात निर्जंतुकीकरण

*सरपंच समीर गावडे यांनी मानले संस्थेचे आभार* बांदा प्रतिनिधी : प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत निगुडे यांच्या सहकार्याने निगुडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी निगुडे ग्रामपंचायत परिसर, निगुडे दूध डेरी संस्था तसेच निगुडे रास्त भाव धान्य दुकान त्याचप्रमाणे निगुडे गावामध्ये ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्या घरी…

Read More
You cannot copy content of this page