प्राणजीवन सहयोग संस्थेकडून निगुडे गावात निर्जंतुकीकरण

*सरपंच समीर गावडे यांनी मानले संस्थेचे आभार*

बांदा प्रतिनिधी : प्राण जीवन सहयोग संस्था, शिरवल यांच्या सौजन्याने व ग्रामपंचायत निगुडे यांच्या सहकार्याने निगुडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जंतुनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी निगुडे ग्रामपंचायत परिसर, निगुडे दूध डेरी संस्था तसेच निगुडे रास्त भाव धान्य दुकान त्याचप्रमाणे निगुडे गावामध्ये ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्या घरी जाऊन जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी कंटेनमेंट झोन असलेली निगुडे येथील नवीन देऊळवाडी, तेलवाडी, कासकरटेंब या ठिकाणी सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी निगुडे सरपंच समीर गावडे व उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी स्वतः उपस्थित राहून फवारणी करून घेतली. प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर व सर्व टीम यांनी निगुडे गावामध्ये जंतुनाशक फवारणी केली व निर्जंतुकीकरण केलं. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच समीर गावडे यांनी कणकवली तालुक्यातून एवढ्या लांब पल्ल्याच्या अंतरावर येऊन निगुडे गाव निर्जंतुकीकरण करून खरोखर या कोविंड च्या कठीण प्रसंगात उल्लेखनीय असे काम केल्याबद्दल प्राण जीवन सहयोग संस्थेचे कौतुक करत मनापासून आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page