*बांदा दि.०९-:* सोसायटी फॉर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट व प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल – कणकवली यांच्या माध्यमातून मडुरा दशक्रोशीतील सार्वजनिक ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. मडुरा तिठा येथून रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्याहस्ते या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला. यावेळी मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, पाडलोस उपसरपंच महादेव गावडे, माजी उपसरपंच विजय कुडतरकर, मडुरा पोलीस पाटील नितीन नाईक, पाडलोस पोलीस पाटील रश्मी माधव, पाडलोस सोसायटी चेअरमन सुभाष करमळकर, तसेच विलास पावसकर, यशवंत माधव, सोमनाथ तोरसकर, श्रीराम जाधव, सिद्धेश सावळ, नाना वेंगुर्लेकर, डॉ. बर्वे, संस्थेचे अंकित आजगावकर, रितेश शेणई, विनायक प्रभुझांट्ये, विश्राम कोचरेकर, मोहन गवस, अक्षय कशाळीकर, राजन गावडे, सिताराम नाईक आदी उपस्थित होते.
प्राणजीवन सहयोग संस्थेच्यावतीने मडुरा पंचक्रोशीत सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझर फवारणी…
